५ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकारी गजाआड


- ५ लाखांचा पहिला हप्ता घेताना रंगेहात अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मारेगाव :
२५ लाख रुपयांची लाच मागितल्याा प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन विभागाने पोलिस दलातील लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या आणि इतर दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद काशिनाथ कुलकर्णी (४८), सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप प्रभाकर चव्हाण (३६) आणि सुनिल विठ्ठल बोटरे (४०) असे लाचखोर अधिकाऱ्यांचे नावं आहेत. 
मुकुंद कुलकर्णी हे एक वर्षाआधी वणी पोलीस स्टेशन येथे ठाणेदार पदावर कार्यरत होते. निरीक्षक मुकूंद कुलकर्णी हे यवतमाळ पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) कार्यरत आहेत. तक्रारदाराला गुन्हयाचा तपास तकलादू करणे, कमजोर चार्जशीट तयार करणे, जप्‍त असलेला माल सोडणे, अधिक माल जप्‍त न करणे, तसेच दाखल गुन्हयातील कलमे कमी करणे आणि तक्रारदाराच्या भावाकडून घेतलेली शेतीची खरेदी, चेक्स, परत करण्यासाठी कुलकर्णी, चव्हाण आणि पोलिस कर्मचार्‍याने २५ लाखाच्या लाचेची मागणी केली होती. या विरोधात तक्रारदाराने यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर अमरावती विभागाचे अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कारवाईचा आदेश दिला. अमरावती विभागातील तसेच यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस अधीकार्‍यांनी सापळा रचला. मागणी केलेल्यापैकी ५ लाख रूपये स्विकारताना सरकारी पंचासमक्ष कारवाई करण्यात आली आहे. पोलिस नाईक सुनिल बोटरेे यांनी ५ लाच स्विकारले. वर्षाच्या सुरवातीलाच अशा प्रकारची मोठी कारवाई झाल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शासकीय लोकसवेकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा अन्यथा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अमरावती विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक पंजाबराव डोंगरदिले, पोलिस उपाधीक्षक गजानन पडघन, कर्मचारी श्रीकृष्ण तालन, सुनिल वराडे, चंद्रकांत जनबंधू, अभय वाघ, महेंद्र साखरे, शैलेश कडू यांनी ही कारवाई करण्यात आली आहे  Print


News - Rajy | Posted : 2019-01-05


Related Photos