महत्वाच्या बातम्या

 पीसीडीए टिम करणार माजी सैनिकांच्या समस्याचे निवारण


- माजी सैनिकांनी २० व २१ रोजी उपस्थित रहावे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : प्रयागराज येथील पीसीडीएची टिम जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी व निवृत्तीवेतनधारक अवलंबित यांच्या करीता जीवन प्रमाण सादर करणे व स्पर्श पीसीडीए संबंधी अडीअडचणीच्या समस्या निवारणासाठी माजी सैनिक मुलींचे वसतिगृह, हिस्लॉप कॉलेजसमोर, नागपूर येथे २० व २१ एप्रिलला सकाळी १० वाजता उपस्थित राहणार आहे.

यासंधीचा जास्तीत जास्त माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी व अवलंबित निवृत्तीवेतनधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०७१२-२५६११३३ या दुरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.





  Print






News - Nagpur




Related Photos