चामोर्शी येथील युवा परिषदेत सैराट फेम अनुजा मुळे यांनी साधला संवाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : 
 चामोर्शी तालुक्यातील युवकांनी युवकांसाठी आयोजित केलेल्या युवक परिषदेत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सैराट फेम अनुजा मुळे यांनी संवाद साधतांना   सैराट व्हा पण आपल्या ध्येयासाठी, असे आवाहन केले. 
चामोर्शीतील युवक पुण्या मुंबई च्या युवकांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत.  त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगु नये असे प्रतिपादन विधी अभ्यासक दीपक चटक यांनी केले. त्यानंतर विधी  अभ्यासक कल्याणी माणगावे यांनी चामोर्शी च्या विकासासाठी युवकांनी एकत्रित आले पाहिजे असे सांगितले. तर मुक्तीपथ चे सुयश तोष्णीवाल यांनी असे सांगितले की व्यसन ही फॅशन ची नाही तर टेन्शन ची बाब आहे,आणि या विरुद्ध युवकांनी आवाज उठवणे गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकामाचे मुख्य आकर्षण असलेल्या सैराट फेम अनुजा मुळे यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी विद्यार्थ्यांना गर्दी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा नेतृत्व बोधी रामटेके, देवानंद उराडे, सचिन मेश्राम, वैष्णव इंगोले आणि प्रयत्न केले. सदर कार्यक्रमासाठी रुचित वांढरे, सुप्रिया चुनारकर, दिलिप शिखरे, ज्योती शिखरे, शिक्षण सह.पतसंस्था चामोर्शी येथील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-05


Related Photos