महत्वाच्या बातम्या

 आजच्या काळात कमी वेळात कुठलीही माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे एक महत्त्वाचे उत्तम माध्यम : खासदार अशोक नेते


- सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य महत्त्वाचा भाग असून आपल्यासाठी वरदान आहे : सोशल मीडिया प्रभारी तथा प्रदेश चिटणीस सौ. श्वेता शालिनी यांचे सुचक वक्तव्य.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली सोशल मीडिया टीमच्या वतीने कॉम्प्लेक्स येथील सर्किट हाऊस येथे आपल्या प्रदेशाच्या सोशल मीडिया प्रभारी तथा प्रदेश चिटणीस सौ. श्वेता शालिनी तसेच गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात आयोजित सोशल मीडिया टीमचा आढावा पार पडला.

या सोशल मीडिया टीमच्या समारोपीय आढावा बैठकीला खासदार अशोक नेते यांनी प्रतिपादन करतांना आजच्या काळात सर्व लोक आपापल्या कामात व्यस्त असल्याने कोणालाही दुसऱ्यासाठी वेळ मिळत नाही. इतका ताण लोकांना कामाच्या निमित्ताने असतो. अशावेळी एखादी बातमी किंवा समस्या ही घरबसल्या पाहण्यासाठी सोशल मीडियाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते.

गडचिरोलीत भारतीय जनता पार्टी संघटनेचे काम चांगल्या प्रभावीपणे सोशल मीडिया काम चालु आहे. तरीपण कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी हयगयीने न करता काम करा. नळी फुंकले सोनारे इकडून तिकडून गेले वारे असे न करता सोशल मीडियाचे काम प्रभावितपणे करावे.

गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त आकांशीत जिल्हा असून जंगलव्यात असल्याने नेटवर्क ची समस्या लक्षात घेता तरी सुद्धा इलेक्ट्रिक मीडिया मोठ्या प्रमाणात चांगले  काम करीत आहे. त्यामुळे आजच्या काळात कुठलीही माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम माध्यम आहे असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी समारोपीय प्रसंगी केले.

सोशल मीडिया प्रभारी तथा प्रदेश चिटणीस सौ. श्वेता शालिनी यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गडचिरोली सोशल मीडिया टीमचा आढावा घेत मार्गदर्शन करतांना, सोशल मीडिया एक असे साधन बनले आहे. ज्याने बऱ्याच लोकांना एका रात्रभरात सुपरस्टार किंवा प्रसिद्ध बनवले आहे विशेषतः,न्युज चॅनलवर,व्हिडिओ, फोटोज, काही ना काही व्हायरस होत असतात यांची प्रसिद्धी करणे म्हणजेच सोशल मीडिया होय.

सोशल मीडिया एक विशाल नेटवर्क आहे. या विशाल नेटवर्कशी कनेक्ट होण्यासाठी आपल्याला इंटरनेट वापरणे आवश्यक आहे. जे आपल्याला जगातील लोकांशी कनेक्ट करते. या सोशल मीडियाचे माध्यम व्हाट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, ट्विटर, युट्युब, इंस्टाग्राम इतर इत्यादी माध्यमे आपण डाउनलोड करून कनेक्ट करावा व याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात  सोशल मीडियावर व्हायरल करावा. कारण सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य महत्त्वाचा भाग असून आपल्यासाठी एक वरदान आहे. असे उत्कृष्ट मार्गदर्शन सरळ व सोप्या भाषेत  समजावत यावेळी 

सोशल मीडिया प्रभारी तथा प्रदेश चिटणीस सौ. श्वेता शालिनी यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले.

 याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते, सोशल मीडिया प्रभारी तथा प्रदेश चिटणीस सौ. श्वेता शालिनी, आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवते, प्रदेश सरचिटणीस एसटी मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये,प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहराध्यक्षा अर्चना निबोंड, शहर महामंत्री केशव निंबोड, शहर महामंत्री विनोद देवजवार, नगरसेवक आशिष पिपरे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, अनिल पोहनकर, युवा नेते संजय मांडवगडे, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, युवा नेते पंकज खरवडे, तालुकाध्यक्ष दिलिप चलाख, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकंपलीवार, प्रत्येक तालुका संयोजक प्रत्येक विधानसभा संयोजक तसेच गडचिरोली शहर आणि प्रत्येक शहरातील सोशल मीडिया कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos