महत्वाच्या बातम्या

 वेतनपथक अधीक्षकांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटना तर्फे अधीक्षक दिलीप मेश्राम आणि त्यांच्या टीम चे सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळेचे भविष्यनिर्वाह निधी व वेतनपथक(माध्यमिक)कार्यालय, गडचिरोली यांनी मागील ३ वर्षापासूनची, कोरोनाकाळातील प्रलंबित देयके तसेच वैद्यकीय देयके, वेतनश्रेणी फरक, सातवा वेतन आयोग हप्ता, निवृत्त व मृत कर्मचाऱ्यांची थकीत देयके मार्च महिन्यात अतिरिक्त परिश्रम घेऊन आर्थिक वर्ष संपण्याच्या आत सर्व बिलांची देयके अदा करून सर्वांना सहकार्य करण्याचे महत्त्वाचे काम केले.           गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटना तर्फे अधीक्षक दिलीप मेश्राम आणि त्यांच्या टीम चे सत्कार करण्यात आला.

भविष्यनिर्वाह निधी व वेतनपथक अधीक्षक दिलीप मेश्राम, वरिष्ठ सहाय्यक कामडी, सहाय्यक लेखाधिकारी विक्की वाळके, राजानंद गजभिये, यांचा पुष्पागुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्यावर चर्चा करण्यात आले. सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या ७ वे वेतन आयोगाचे प्रलंबित तिन्ही हफ्ते प्रदान करण्यात आले आहे. काही प्रस्ताव मध्ये तांत्रिक बाबी असल्याने ते या आर्थिक वर्षात मंजूर होणार आहे. एरिअर्स देयक हे नागपूर हुन मंजूर होऊन आले परंतु निधी नसल्याने ते प्रलंबित आहेत. ते लवकरच मंजूर करण्यात येणार आहे. असे जिल्हा संघटनेच्या पदाधिकारी सोबत झालेल्या चर्चेत अधीक्षक दिलीप मेश्राम यांनी माहिती दिली. यावेळी अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात आली.

यावेळी गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष अशोक काचीनवार, जिल्हा कार्यवाह उदय धकाते, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप भरणे, अरुण धोडरे, भूपेश वैरागडे, प्रकाश, चुधरी, आशिष आत्राम उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos