नागपूर विभागातील १११ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ई-भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर  :
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत विभागातील 111 योजनांचा ई-भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या शनिवार दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात होत आहे.
विभागातील सहा जिल्ह्यातील 111 योजनांचा समावेश असून यावर 88 कोटी 26 लक्ष 68 हजार रुपये खर्च  येणार आहे.   या योजनांमुळे 2लाख 54 हजार लोकसंख्येला लाभ होणार आहे.  मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांर्तगत  36 योजना असून यावर 29 कोटी 22 लक्ष रुपये तर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत 75 योजना असून यावर  59 कोटी 5लक्ष रुपये किमतींच्या योजनांचा यात समावेश आहेत.
 विभागातील सहा जिल्ह्यापैकी नागपूर जिल्ह्यातील 44 योजना अंदाजित किंमत  55 कोटी 29 लक्ष, वर्धा 1 योजना 1 कोटी 10 लक्ष, भंडारा 16 योजना 7कोटी 25 लक्ष, गोंदिया 10 योजना 4कोटी 91 लक्ष, चंद्रपूर 32 योजना 13 कोटी 80 लक्ष 84 हजार तर गडचिरोली जिल्ह्यातील 8 योजना 5कोटी 89 लक्ष 87 हजार रुपयांचा समावेश  आहे.
ई-भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर , पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीश राजे आत्राम, तसेच विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष  विधानसभा व  विधानपरिषद सदस्य जिल्हा परिषदेचे पदाधिकारी  आदी उपस्थित राहणार आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-01-05


Related Photos