महत्वाच्या बातम्या

 उर्वरित निधी लवकरच दुष्काळ पीडीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जमिनीचे  नुकसान झाले. अशा १ लाख ९७ हजार २७३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २७३ कोटी १० लाख ३ हजार १०९ रुपयांचे अर्थसहाय्य जमा करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच निधीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटकर यांनी दिली.
जिल्ह्यात ३३९ कोटी ६८ लाख ५३ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून ८०.३७ टक्के निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. काही तांत्रिक कारणामुळे उर्वरित १९ टक्के निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकला नाही. येत्या दोन-तीन दिवसात दुष्काळ पीडीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे .





  Print






News - Nagpur




Related Photos