महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्रातील संशोधन अधिछात्रवृत्ती देणाऱ्या संस्थांची नियमावली निश्चित असावी : अभाविप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन संदर्भात अग्रेसर राहिले आहे. संशोधनास चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय या चार संस्था विविध समाज घटकातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थांना फेलोशिप देतात. या संस्थाच्या संशोधन फेलोशिप नियमावलीमध्ये मोठी तफावत दिसून येते त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र सरकारने या संस्थाच्या PHD  फेलोशिप संदर्भात एक निश्चित नियमावली तयार करुन खालील मागण्यांची पूर्तता करावी. 


मागण्या :

१) सर्व संस्थांमधील संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात यावी. 

२) फेलोशिप रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा कालावधी निश्चित करावा. 

३) प्रत्येक संस्थेचे विभागानुसार उपकार्यालय असावे.

४) या सर्व संस्थांच्या फेलोशिप संदर्भात नियमावली बनवण्यासाठी महाराष्ट्र संशोधन परिषदची स्थापना करण्यात यावी व या परिषदेच्या माध्यमातून संशोधन गुणवत्तेचे नियमन केले जावे. 

५) खुल्या (ओपन) प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना अमृत संस्थेकडून तत्काळ संशोधन फेलोशिप देण्यात यावी.


संशोधन टिकून राहण्यासाठी वरील सर्व मागण्या ह्या फेलोशिप संदर्भात असलेल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी महत्त्वाच्या असून सरकारने या मागण्यांचा विचार करून त्याची पूर्तता करावी असे मत राष्ट्रीय मंत्री कु. अंकिता पवार यांनी मांडले आहे.

वरील सर्व मागण्याचा महाराष्ट्र सरकारने सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा व संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी चालना देत दिलासा द्यावा असे मत अभाविप विदर्भ प्रदेश मंत्री शक्ती केराम यांनी व्यक्त केले.

या मागण्या पूर्ण न झाल्यास अभाविप महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos