जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भामरागड येथे जात प्रमाणपत्रांचे वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यात  राबविण्यात येत असलेल्या विर बाबुराव शेडमाके सुलभ जात प्रमाणपत्र योजनेंतर्गत जात प्रमाणपत्रांचे वितरण आज ४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याहस्ते करण्यात आले.
तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाचा  शुभारंभ जिल्हाधिकारी सिंह यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी राणीपोडूर येथील १०० नागरीकांना जात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तालुका प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली. यावेळी तहसीलदार कैलास अंडील यांनी प्रास्ताविक केले. सभेचे संचालन गटसाधन केंद्र भामरागड येथील सोरते यांनी केले. आभार नायब तहसीलदार सोनवणे यांनी मानले. यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ताडगाव येथील कर्मचारी निवासस्थान इमारतीचे उद्घाटन केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-04


Related Photos