महत्वाच्या बातम्या

 वर्धमनेरी येथे सिलेंडरने घेतला पेट


- आगीत दोन मुली भाजल्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (आर्वी) : वर्धमनेरी येथील आशिष बडगे यांच्या घरी रात्री ८  वाजता स्वयंपाक घरात सिलेंडरने पेट घेतल्याने आग लागली.

घरातील सर्व सामान जळून खाक झाले त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

आमदार दादाराव केचे यांनी आर्वी नगरपालिकेच्या फायर ब्रिगेड पाठवून गावकऱ्याच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर अंजली वय ८, तनु वय ४ या मुलींना उप जिल्हा रुग्णालय आर्वी येथे दाखल करण्यात आले. आग विझविण्याकरिता गावकरी अनिल मोरे, धीरज मनोहर, विकिम आश्रम, मनोज मुदगल, अनिल कोकाटे, रवी शिंपीकर, पंजाबराव वरठी यांनी सहकार्य केले. 





  Print






News - Wardha




Related Photos