राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीच्या वादावर आता १० जानेवारी ला पुढील सुनावणी


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  अयोध्या येथील राम जन्मभूमी-बाबरी मशीद  प्रकरणी येत्या १० जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने आज स्पष्ट केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात होणारी आजची सुनावणी पुन्हा एकदा टळली आहे. 
 पुढील सुनावणी आता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणी अंतिम सुनावणी कधी होईल किंवा नियमित सुनावणी होईल की नाही हे १० जानेवारीलाच स्पष्ट होऊ शकेल.  राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावर कोर्टाने केवळ ६० सेकंदामध्येच निर्णय देत १० जानेवारीला पुढील सुनावणी होईल असे सांगितले. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. संजय किशन कौल यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी ठेवण्यात आली होती. पक्षकारांच्या दोन्ही बाजूंनी कोणतीही बाजू मांडण्यात आली नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.   Print


News - World | Posted : 2019-01-04


Related Photos