महत्वाच्या बातम्या

 कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शेतकरी विकास आघाडी सज्ज : खासदार रामदास तडस


- भाजपा, शिवसेना व आर.पी.आय. पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार व भाजपाच्या वर्धा तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसह आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा.

- भाजपा, शिवसेना व आर.पी.आय. पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराची दमदार सुरुवात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास आघाडी सज्ज झाली असुन या निवडनुकीत भाजपा, शिवसेना व आर.पी.आय. पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुमताने निवडूण येणार असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

श्री. हनुमान मंदीर, सालोड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराची दमदार सुरुवात झाली असुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिलला जयंतीचे औचीत्य साधुन भाजपा, शिवसेना व आर.पी.आय. पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार व भाजपाच्या वर्धा तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसह आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला, यावेळी भाजपाचे खासदार रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, आमदार डॉ. पंकज भोयर, प्रदेश सचिव राजेश बकाने, श्याम कार्लेकर, किरंण उरकांदे, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रमुख तथा प्रभारी मिलींद भेंड, वर्धा विधानसभा प्रमख आशिष कुचेवार, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वर्धा कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक-२०२३ भाजपा, शिवसेना व आर.पी.आय. (आठवले गट) पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीचे निवडणूकीकरिता सहकारी संस्था गटातुन अधिकृत सर्वसाधारण गट उमेदवार श्याम भिमराव कार्लेकर, मुकेश विनायकराव अळसपुरे, गजानन शंकर महाजन, गजानन महादेव उगेमुगे, किरण भैय्याजी उरकांदे, पुरुषोत्तम यशवंतराव हिवंज, नंदकिशोर निळकंठराव झोटिंग, इतर मागासवर्गीय सह. संस्था -भूषण पद्माकरराव झाडे, विमुक्त जाती/भटक्या-सह. संस्था-गजानन भाऊराव दुतारे, महिला राखीव सह. संस्था- रंजना माधवराव वानखेडे, रेखा अशोकराव कडू, ग्राम पंचायत गटातुन आर्थिक दुर्बल घटक-सलिमखाँ बब्बूखाँ पठाण, अनुसुचित जाती-प्रकाश सेवकदास पाटील, सर्वसाधारण-आनंद रमेशराव खंडागळे, सर्वसाधारण-अनंता मधुकर हटवार हे उमेदवार रिंगणात असुन सर्व उमेदवारांना बहुमताने निवडूण आनण्याचे आवाहन यावेळी सर्व पदाधिकारी यांना केले.





  Print






News - Wardha




Related Photos