अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध कारवाई : वाहनासह ५० लाख ४८ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : पोलीस स्टेशन उमरेड अंतर्गत येणाऱ्या ०४ कि.मी. अंतरावर गांगापुर जवळील पुलावजळ १४ एप्रिल २०२३ चे १:०० वा. ते १:१० वा. दरम्यान जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, गांगापुर पुलाजवळ ट्रकच्या साहाय्याने अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त बातमीवरून जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण येथील स्टाफने घटनास्थळी जावुन वाहन थांबवुन चेक केले असता १) ट्रक क्र. एम एच ३६ ए ए-३०२८ अशोक ले लॅन्ड १० चक्का मध्ये चालक आरोपी सतिश बाळकृष्ण बोरीकर (२६) रा. नवेगाव पवणी जि. भंडारा २) ट्रक के एम एच ३६ ए ए २२९६ टाटा कंपनीचा १० चक्का चा चालक आरोपी मोहन शंकर हटवार (२६) रा. आसगाव ता. पवनी जि. भंडारा यांनी आपापल्या ताब्यातील ट्रकमध्ये विनापरवाना (रॉयल्टी) रेतीची चोरटी वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने आरोपीतांच्या ताब्यातुन १) १२ बास रेती किमती अंदाजे ४८ हजार रू. २) ट्रक क्र. एम. एच ३६ ए ए ३०२८ अशोक ले लॅन्ड १० चक्का किमती अंदाजे २५ लाख रू. व ट्रक क्र. एम एच ३६ ए ए- २२९६ टाटा कंपनीचा १० चक्का किंमती अंदाजे २५ लाख रु. असा एकुण वाहनासह किंमती अंदाजे ५० लाख ४८ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी पोहवा ८११ मंगेश नरेंद्रराव काळे वाहतुक शाखा नाम्रा. नागपुर याच्या रपोर्टवरून पोलीस स्टेशन उमरेड येथे आरोपीताविरूद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला, असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि पांडे मो. नं. ९७६३७०७९८४ हे करीत आहे.
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक विजय माहुलकर यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार मंगेश काळे, विजय तायडे चालक पोलीस हवालदार गुरूचरणसिंग जब्बल यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
News - Nagpur