देवलापारच्या जंगलात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
रामटेक तालुक्यातील देवलापारच्या जंगलात  काल ३ जानेवारी रोजी वाघाचा एक बछडा मृतावस्थेत आढळून आला आहे.  वन खात्याचे कर्मचारी पेंच व्याघ्र अभयारण्यातील देवलापार परिक्षेत्रात गस्तीवर असताना त्यांना बछड्याचे शव दिसले. 
  वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर  मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून  बछड्याच्या मृत्यूचे नेमके कारण  चौकशीअंती कळू शकेल.  उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील चिंचखेड बिटात नुकताच एक नर वाघ मृतावस्थेत आढळला होता. त्याचठिकाणी सोमवारी एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे. सलग दोन दिवसात दोन वाघांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दोन्ही वाघांवर विषप्रयोग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.  Print


News - Nagpur | Posted : 2019-01-04


Related Photos