भाजपाची शिवसेनेला ३१ जानेवारीपर्यंत डेडलाइन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
   लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची की नाही यासाठी भाजपाने शिवसेनेला ३१ जानेवारीपर्यंत डेडलाइन दिली आहे.   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचार करुन आपला निर्णय कळवण्यास सांगितलं असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दिल्लीत बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील भाजपा खासदारांची बैठक पार पडली. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेच्या अवास्तव मागण्या मान्य करण्यासाठी पक्ष झुकणार नसल्याचं स्पष्ट केलं. यासोबतच शिवसेनेच्या निर्णयाची ठराविक वेळेपर्यंतच वाट पाहू असंही सांगितलं. महाराष्ट्रात युती करायची असेल तर काही गमावून करणार नाही असं अमित शाह यांनी ठणकावून सांगितलं आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवण्याचीही भाजपाची तयारी आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. या बैठकीत शाह यांनी खासदारांना निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत नारायण राणेही उपस्थित होते.    Print


News - Rajy | Posted : 2019-01-04


Related Photos