महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


१६ एप्रिल महत्वाच्या घटना

१८५३ : भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.

१९२२ : मुळशी सत्याग्रह सुरू झाला.

१९४८ : राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.

१९७२ : केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.

१९९५ : निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९९ : चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.

१६ एप्रिल जन्म

१८६७ : ऑर्व्हिल राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राइट यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९१२)

१८८९ : विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९७७)

१९२४ : भारतीय राजनयिक मदनजीत सिंग यांचा जन्म.

१९३४ : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांचा जन्म.

१९४२ : विल्यम्स एफ-१ रेसिंग टीमचे स्थापक फ्रॅंक विल्यम्स यांचा जन्म.

१९६१ : भारतीय वकील आणि राजकारणी जर्बोम गॅमलिन यांचा जन्म.

१९६३ : पाकिस्तानी क्रिकेटपटू सलीम मलिक यांचा जन्म.

१९७२ : स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू कोंचिता मार्टिनेझ यांचा जन्म.

१९७८ : मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता यांचा जन्म.

१९९१ : चित्रपट आणि नाटक अभेनेते आशिष खाचणे यांचा जन्म.

१६ एप्रिल मृत्यू

१७५६ : फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १६७७)

१८५० : मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १७६१)

१९६६ : शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८२)

१९९५ : अभिनेते आणि वकील रमेश टिळेकर यांचे निधन.

२००० : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos