नागभिड - नागपूर ब्राॅडगेज बाबत खा. नेते यांची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा


- लवकरच भूमिपुजनाची तारीख कळणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
नागभिड - नागपूर ब्राॅडगेज बाबत गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा केली. कामाचे भूमिपुजन करण्याची तारीख लवकरच जाहिर करणार येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री गोयल यांनी दिली आहे.
काल ३ जानेवारी रोजी रेल्वेमंत्री पियुष गोयल व रेल्वे मंत्रालयातील सचिवांची खा. अशोक नेते यांनी भेट घेवून निवेदन सादर केले. लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री गोयल यांनी दिले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी शेरा दिलेल्या पत्रावर सुध्दा यावेळी चर्चा करण्यात आली. या कामाचे लवकरच भूमिपुजन होईल, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी दिली आहे.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-01-04






Related Photos