महत्वाच्या बातम्या

 नक्षल्यांच्या खोटारडेपणाची पोलखोल


- सनदशीर मार्गाने शिक्षण घेणारा साईनाथ दोषी कसा? आणि कित्येकांचे आयुष्य उध्वस्त करणारा देवीदास अडवे गावडे निर्दोष कसा ?

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : त्याअनुषंगाने कळविण्यात येते की साईनाथ चेतु नरोटी हा पोलीसांचा खब-या म्हणून काम करीत नसून तो एक गरीब होतकरू विद्यार्थी असुन ०३ वर्षापासून गडचिरोली येथे राहून शिक्षण घेत होता. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित लिपीक, तलाठी, पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षेची तो तयारी करीत होता. 

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती करीता २५,००० उमेदवारांनी फार्म भरला होता, ते सर्व उमेदवार पोलीस खबरीच होते काय? नाही, त्यांनी सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी पोलीस भरती करीता फार्म भरला होता. नक्षलवाद हा गडचिरोली जिल्ह्यातील ठराविक अतिदुर्गम भागापुरता मर्यादीत राहीला असून सदर भागातील तरुणांनाच ते मुद्दाम लक्ष करत आहेत, नक्षलवादी हे एखाया निरपराध व्यक्तीची हत्या करुन परीसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करतात. तसेच ते आदीवासी जनतेची दिशाभूल करून स्वतःचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतात.

आदिवासी मुले शिक्षीत व उच्च शिक्षीत झाल्यास सध्या ज्याप्रमाणे निरक्षर आदीवासी जनता वाद्यांना मदत करीत आहे व त्यांचे कडुन ज्यापद्धतीने ते आपली कामे करवुन घेत आहेत, तशी कामे शिक्षीत आदीवासी तरुणाकडुन होणार नाही. त्यामुळे नक्षल चळवळीला हादरा बसुन नक्षल चळवळीला कोणीही पाठीचा येणार नाहीत किया मदत करणार नाहीत तसेच नक्षल चळवळीमध्ये सामील होणार नाहीत हे नक्षलवादी जाणले आहेत. म्हणून आदीवासी भागातील तरुण मुले शिक्षणासाठी बाहेरगावी राहील्यास तो पोलीस खबऱ्या आहे, पोलीसांना मदत करतो, नलची माहीती पोलीसांना देतो असा गैरसमज गावात व परीसरात पोहचवून किंवा त्यांच्यावर इतर प्रकारे दडपण आणुन (उदा, आई-वडीलांचा किया ईतर जिल नातेवाईकांचा खून करणे, घर जाळणे, घराची नासधूस करणे इत्यादी) त्याला शिक्षणापासून वंचित करून गावी येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करतात, जर का तो त्यांच्या म्हणत्या प्रमाणे गावी आला नाही तर तो पोलीसांचा खबरी असल्याचा किया तो पोलीस भरतीसाठी गेला होता, असा बहाना करून संधी साधून त्याचा खून करतात. जेणे करुन बाकीचे शिक्षीत मुले चाहेर जाउन उच्च शिक्षण घेणार नाहीत किंवा इतर तरुणावर त्याचा वचक पडुन ते बाहेरगावी जाणारच नाहीत. ते बाहेरगावी गेले नाहीत तर त्यांचा उपयोग नक्षल चलवलीकरीता नक्षलवाद्यांना करता येईल.

साईनाथच्या खुणाच्या गुन्ह्यात अटक असलेला नामे देविदास उर्फ प्रकाश उर्फ अडवे मुरा गावडे वय ३२ वर्ष, रा. मदंर हा सन २००० मध्ये पेरमिली दलममध्ये भरती होउन नक्षल चळवळीत सामील झाला. दलममध्ये भरती होण्यापुर्वी तो गावी शेतीची कामे करीत होता. पेरमिली इलमची एरीया सेक्रटरी नर्मदाक्का व कमांडर प्रभाकर पट्टे हे महीन्यातून एक-दोनदा गावात येत असल्याने तो त्यांचे नाचगाणे व भाषणाने प्रभावित होउन सन २००० मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाला. नंतर त्याची प्लॉटुन दलम-उत्तर गडचिरोली- गोंदाया डिव्हीजन मध्ये बदली झाली. नंतर तो सन २०११ ते २०१२ मध्ये देवरी दलममध्ये कार्यरत होता.


नामे देविदास उर्फ प्रकाश उर्फ अडचे मुरा गावडे यास २० फेब्रुवारी २०१२ मध्ये पहील्यांदा अटक झाली असून त्याच्यावर असलेल्या एकूण १८ गुन्ह्यामध्ये त्यास अटक करण्यात आली. त्यास पोस्टे कोरची अप.क्र. २३/२००६ मध्ये २२ मे २०१४ रोजी ०५ वर्ष कैदेची शिक्षा व १०००/-रु. दंडाची शिक्षा झाली होती. तो शिक्षा भोगुन सन-२०१८ मध्ये जेलमधुन रिहा झाला होता व तो मौजा मदर येथे राहून नक्षलांना सहकार्य करीत होता. घटनेपूर्वी तो साईनाथ बाबत गावात विचारपुस करीत होता. घटनेदिवशी तो नक्षलवाद्यासोबत हजर राहुन गुन्यात सहकार्य केले आहे. सदर गुन्ह्यामध्ये केवळ नाम- देविदास उर्फ प्रकाश उर्फ अडये मुरा गावडे हा एकच आरोपी अटक असून नक्षलवाद्यांनी जारी केलेल्या प्रेसनोट मध्ये १० लोकांना पोलीसांनी अटक केल्याचे नोंद आहे. ही बाब तथ्यहीन असून आदीवासी बांधवांची दिशाभुल करणारी आहे. अशाच पद्धतीने चुकीची माहीती प्रकाशीत करून या चुकीची माहीती सांगुन आदीवासी बांधवांना नक्षल चळवळीमध्ये सहभागी होण्याकरीता प्रवृत केले जाते. तरी पोलीस प्रशासन अशा चुकीच्या माहीतीवर विश्वास ठेवु नये, पाचचात आदीवासी बांधवाना याद्वारे सतर्क करत आहे.

नक्षलांनी आतापर्यंत ५५० निष्पाप नागरिकांची व ३५ पोलीस खबऱ्यांची हत्या केली आहे. गडचिरोली पोलीस दलाने नक्षलपिडीत कुटुंबियांना अर्थिक मदत व्हावी या हेतुने प्रयत्न केले गेले. त्याद्वारे २०६ नक्षलपिडीत कुटुंबियांना केंद्र शासन अंतर्गत प्रत्येकी ५ लक्ष ६६ नागरिकांना महाराष्ट्र शासन अंतर्गत ३ लक्ष रु. २१३ नक्षलपिडीत कुटुंबियांना एसआरई अंतर्गत २ लक्ष रु. ३५ पोलीस यांना महाराष्ट्र शासन अंतर्गत ५ लक्ष रु. मदत मिळवून दिली आहे. तसेच १५ नक्षलपिडीतांना पोलीस दलात व ७१ नक्षलपिडीतांना ईतर विभागात शासकिय नोकरी मिळवून दिली आहे. नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या ५५० निष्पाप आदिवासी बांधवांचे कुटुंबिय आज देखील लोकशाही मार्गाने न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवुन न्यायाठी लढा देत आहे.

सध्या गडचिरोली जिल्ह्यात नागरी कृती दलाच्या माध्यमातुन प्रत्येक गावात पोलीस भेट देत असून शासनाच्या विविध योजनांची माहीती दादालोरा पोलीस खिडकीच्या माध्यमातुन घरोघरी पोहोचविण्याचे काम करीत असून निरक्षर, असहाय्य, गरीब आदीवासी बांधवांना शासकिय योजना मिळवून देण्याचा प्रयत्न दादालोरा पोलीस खिडकीच्या माध्यमातून पोलीस दल करीत आहे. 

त्यामुळे ०३ वर्षा पासून एकही आदीवासी तरुण/तरुणी नक्षल चळवळीत सहभागी झाले नसल्याने नस्ल चळवळीस हादरा बसला असल्याचे त्यांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना आता गडचिरोली जिल्ह्यातुन नक्षल हद्दपार होते किया काय अशी त्यांना भिती वाटु लागली आहे. म्हणून आदीवासी समाजातील त्यांची दहशत कायम राहावी, त्यांच्या नक्षल चळवळीला आदीवासी बांधवाकडून सहकार्य मिळावे, चाहेर शिक्षणासाठी जाणा-या तरुण/तरुणीवर वचक निर्माण व्हावी म्हणून साईनाथ नरोटी सारख्या निरपराध तरुणाचा खून केला असून सदर खूनात नाम- देविदास उर्फ प्रकाश उर्फ अडये मुरा गावडे याचा सक्रिय सहभाग असल्याचे तपासावरुन निष्पन्न झाले आहे.

नक्षलवाद्यांनी साईनाथ चैतु नरोटी हा पोलीस खबरी होता व नामे देविदास उर्फ प्रकाश उर्फ अडवे मुरा गावडे हा निर्दोष आहे असे त्यांच्या प्रेस रिपोर्ट मध्ये नोंद केलेले आहे. परंतु सदर बाब ही खोटी असून साईनाथ चैतु नरोटी हा पोलीसांचा खबरी नसुन त्याचा पोलीसांशी कसलाही संबंध नव्हता. त्याच्या खूनात नामे देविदास उर्फ प्रकाश उर्फ अडवे मुर्रा गावडे याचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच माओवादी चळवळीतून आत्मसमर्पण करणाऱ्या अनेक आदीवासी बांधवांचा पोलीस मुखबिर म्हणून करपणे खुण करण्यात आलेला आहे. अडवे मुरा गावडे हा नक्षल चळवळीतून सशर्त माघार घेउन मागील काही वर्षांपासून गावी राहून सक्रियपणे नक्षलवाद्यांना मदत करत आहे म्हणून नक्षलवाद्यांनी त्याला अभय दिलेले आहे असे तपासात निष्पन्न झाले आहे.

नक्षलवादी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानतात. परंतु त्यांच्या राज्य 2/3 विश्वास नाही. बाबासाहेब नेहमी अहिंसेचे पुरस्कर्ते होते. बाबासाहेबांनी लेखणीद्वारे केलेली क्र. होती ना की, बंदुकीच्या नळीच्या धाकावर मिळवलेली. त्यामुळे बाबासाहेबांनी केलेल्या लेखणीची क्रांती ही माओवादीने केलेल्या क्रांती पेक्षा खुप मोठी आहे.

नक्षलवाद्यांची प्रतिमा समाजात केवल हिंसाचारी, दरोडेखोर, खंडणीखोर, खूनी, स्वार्थी अशीच आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांची समाजाला गरज नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर आदीवासी बांधवांना वेठीस न धरता बाबासाहेबांच्या विचारावर आधारित राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करुन मुख्य प्रवाहात सामिल होणे गरजेचे आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos