महत्वाच्या बातम्या

 युवकांनी देशसेवेसाठी पुढाकार घ्यावा : आमदार डॉ. देवराव होळी


- कुरुड विसापूर जि. प. क्षेत्रातील, युवा मोर्चाच्या वतीने पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या युवक युवतींचा सत्कार समारंभ कार्यक्रम
- युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकरराव भांडेकर यांच्या पुढाकाराने आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आज देशाला खरोखरच युवक युवतींची आवश्यकता असून तरुणांनी देशसेवेसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार  डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली पोलीस दलामध्ये नुकतीच निवड झालेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार करतांना केले. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


यावेळी निवड करण्यात आलेले उमेदवार, पंकज सुरेंद्र सोमनकर, मंगेश भाऊराव सातपुते, अमन सुनिल वेलादी,आकाश दशरथ शेंगर, आकाश दशरथ जुवारे  (महाल), गणेश मोहन गुरनुले आमगाव (महाल) दुर्योधन ईश्वर सोमनकर अनंतपूर, विवेक पंडरी बुरांडे कुंभारवाही, कु. प्रियंका रमेश सातपुते वालसरा, पालेश्वरी साईनाथ मुलकलवार वालसरा, यांचा आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी, स्वप्नील वरघंटे भाजयुमो प्रदेश सदस्य,  तालुकाध्यक्ष दिलिपजी चलाख , मधुकर के. भांडेकर जिल्हा महामंत्री भाजपा युवामोर्चा, तथा पालक व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos