चंद्रपूर आरटीओ कार्यालयात परवाना विभागातील खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात


- परमिटी देण्यासाठी मागीतली दोन हजारांची लाच
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
चारचाकी गाडीचे ऑल इंडिया परमिट  देण्याकरीता दोन हजारांची लाच स्वीकारताना चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील परवाना विभागातील मदतनिस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
संजय उध्दव नगराळे (३४) असे लाचखोर मदतनिसाचे नाव आहे. तक्रारदार ट्रॅव्हल्सचे काम करतो. ७ डिसेंबर रोजी त्यांनी चारचाकी वाहन खरेदी केले. एमएच ३४ बीजी ४०१३ क्रमांकाचे ऑल इंडिया परमिट काढण्याकरीता कागदत्रे सादर करून दोन हजार रूपये शुल्क ऑनलाईन भरले. परमिट घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेले असता संजय नगराळे याने दोन हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीची शहनिशा करून सापळा रचला. तडजोडीअंती १ हजार २०० रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई पोलिस उपायुक्त , पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात डी.एम. घुगे, पोलिस निरीक्षक  पुरूषोत्तम चौबे , पोलिस हवालदार मनोहर एकोणकार, नापोकाॅ महेश मांढरे, संतोष येलपुलवार, सुभाष गोहोकार, अजय बागेसर, मपोशि समिक्षा भोंगळे, चालक शिपाई राहुल ठाकरे यांनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-03


Related Photos