खा. रामदास तडस यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट


- चार वर्षांचा कार्य अहवाल केला सादर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : 
भारताचे केंद्रीय रस्ते परीवहन, महामार्ग, जलसंधारण मंत्री तसेच लोकप्रीय नेते नितीन गडकरी यांची खासदार रामदास तडस यांनी सदिच्छा भेट घेऊन वर्धा लोकसभा मतदार संघातील २०१४ ते २०१९ चा खासदार म्हणून केलेला कार्य अहवाल सादर केला.
  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री   देवेन्द्र  फडणवीस व वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री  सुधिर मुनगंटीवार यांच्या सहकार्यामुळे वर्धा लोकसभा मतदार संघातील अनेक प्रलंबीत असलेली मोठी कामे मार्गी लागली. यामध्ये प्रामुख्याने वर्धा लोकसभा क्षेत्रात ४०० कि.मी. पेक्षा जास्त नविन राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, वर्धा येथे विदर्भातील पहिले पासपोर्ट सेवा केन्द्र, दिव्यांगाना मोफत साहित्याचे मेळावे, वर्धा नांदेड रेल्वे मार्गाला प्रत्यक्ष सुरुवात, सेवाग्राम विकास आराखडा, बजाज चैक येथील प्रगतीपथावर असलेले रेल्वे उड्डाणपुलांचे कार्य, पुलगांव व सिंदी (रेल्वे) येथील रेल्वे उड्डाण पूल,  वर्धा रेल्वेस्थानकावर मोफत वायफाय, वर्धा रेल्वेस्थानकावर अतिरीक्त पादचारी पुल निर्मीतीला मान्यता, वर्धा रेलस्थानक जागतिक दर्जाचे प्रवासी केन्द्र निर्मीतीला केन्द्रशासनाची मान्यता, नवजिवन एक्सप्रेसला पुलगांव येथे थांबा, जबलपूर व इंटरसिटी एक्सप्रेसला चांदूर येथे थांबा, जबलपूर एक्सप्रेसला सिंदी रेल्वे येथे थांबा, पुणे काजीपेठ एक्सप्रेसला हिंगणघाट येथे थांबा, इंटरसिटी एक्सप्रेसच्या फेरीमध्ये वाढ करुन अपडाऊन करणाऱ्या प्रवाश्यांना अतिरीक्त प्रवासी डब्बा मंजूर करणे, लोकसभाक्षेत्रातील नगर परिषदेंना वैशिष्टयपुर्ण निधी, ग्रामीण भागाकरिता २५१५ चा निधी, महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पातील विविध विकास कामे, केन्द्रीय मार्ग निधीतून ग्रामीण रस्त्याचे जाळे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील विविध कामे, पाणीपुरवठा योजना, बसस्थानकांचे नुतनीकरण, सिंदी येथे ड्रायपोर्ट प्रकल्प, सिंदी विहीरी येथील मेगा फुड पार्क, खासदार निधीतून पुर्ण करण्यात आलेली विविध विकास कामे, हिंगणघाट-जाम-कारंजा (घाडगे) येथे नविन उड्डाणपूलांना मंजूरी., पोस्ट ऑफिस मध्ये रेल्वे आरक्षण केन्द्र, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण) या सर्व प्रकल्पांना मागील चार वर्षांमध्ये अतिशय गतीने चालना मिळालेली असून वर नमुद केलेल्या सर्व कामांची माहिती देणारा कार्य अहवाल  नितीन  गडकरी यांना खासदार रामदास तडस यांनी सपुर्द केला.
 भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संघटनेकरिता व पक्षबांधणीकरिता लोकसभा क्षेत्रात घेण्यात आलेले विविध कार्यक्रम व संघटना विस्ताराकरिता राबविण्यात आलेली पंडीत दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजना या सर्व विषयांशी निगडीत माहिती कार्यअहवालामध्ये नमुद करण्यात आलेली आहे.   Print


News - Wardha | Posted : 2019-01-03


Related Photos