महत्वाच्या बातम्या

 पुन्हा असे बाबासाहेब होणे नाही : आमदार डॉ. देवराव होळी


- भीम जयंती निमित्य आमदार डॉ. देवराव होळी यांच्या संविधान निर्माता बाबासाहेबांना अभिवादन

- चामोर्शी, वायगाव ,चांदेश्र्वर, आष्टी, घोट, किस्टापुर टोला अनखोडा, धानोरा गडचिरोली येथील विविध भीम जयंती कार्यक्रमांत उपस्थिती

- धानोरा येथे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन असामान्य कर्तृत्व गाजवणारे संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची देशाला गरज असून पुन्हा असे बाबासाहेब होणे नाही, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी भीम जयंतीच्या निमित्य आयोजित कार्यक्रमांमध्ये केले.

यावेळी सकाळपासूनच त्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी, वायगाव ,चांदेश्र्वर, आष्टी, घोट, किस्टापुर टोला अनखोडा, धानोरा गडचिरोली येथील विविध भीम जयंती कार्यक्रमांत उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले.

धानोरा येथे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी धानोरा येथील सोपान म्हशाखेत्री, देवनाथ म्हशाखेत्री, बाळू उंदिरवाडे, ऋषी म्हशाखेत्री, रजनी म्हशाखेत्री, खुशाल ढवळे, शिवकुमार भैसारे, साईनाथजी साळवे, सारंग साळवे तथा बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos