महत्वाच्या बातम्या

 पोहण्याचा मोह पडला जीवाशी : दाेन शाळकरी विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : मित्र असलेले दाेन शाळकरी विद्यार्थी पाेहण्यासाठी तलावात गेले आणि बुडाले.  

सदर घटना कुही पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील सिल्ली शिवारात १३ एप्रिल २०२३ ला सायंकाळी उघडकीस आली. दाेघांचेही मृतदेह रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास तलावातून बाहेर काढण्यात आले.

माहितीनुसार लावण्य ज्ञानेश्वर जीभकाटे (१३) व साहील श्रीराम जीभकाटे (१५) दाेघेही रा. सिल्ली, ता. कुही अशी मृतांची नावे आहेत. लावण्य हा कुही शहरातील रुख्खडाश्रम पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवीत, तर साहील सिल्ली येथील स्व. संतोषराव रडके हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकायचा. एकाच गावचे असल्याने दाेघेही मित्र हाेते. लावण्यच्या शाळेला सुट्या लागल्या असून, साहीलची सकाळची शाळा असल्याने दाेघेही गुरुवारी दुपारी सायकलने सिल्ली शिवारात तलावाकडे फिरायला गेले हाेते.

तलाव गावापासून अंदाजे अर्धा किमी अंतरावर आहे. त्यांनी सायकली तलावाच्या काठी उभ्या केल्या आणि तलावात पाेहायला सुरुवात केली. खाेल पाण्यात गेल्याने दाेघेही बुडाले. परिसरात कुणीही नसल्याने हा प्रकार कुणाच्याही निदर्शनास आला नाही. सायंकाळी नागरिकांना तलावाच्या काठी दाेन सायकली आणि कपडे आढळून आल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी लगेच कुही पाेलिसांना सूचना दिली. रात्री ७ वाजण्याच्या सुमारास पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेघांचाही पाण्यात शाेध घ्यायला सुरुवात केली. रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास दाेघांचेही मृतदेह शाेधून काढण्यात पाेलिसांना यश आले. याप्रकरणी कुही पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos