लिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडीदारांनी संमतीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरत नाही : सुप्रीम कोर्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / दिल्ली :
लिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडीदारांनी संमतीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. महाराष्ट्रातील एका महिलेने डॉक्टरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी डॉक्टरच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय देत महाराष्ट्रातील महिलेने डॉक्टरविरोधात दाखल केलेला गुन्हाही रद्द केला आहे.
 संबंधित महिला ही परिचारिका असून डॉक्टरसोबत काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे तिने म्हटले होते.  महिलेने डॉक्टरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. संबंधित महिलेच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर ती एका डॉक्टरकडे काम करु लागली. डॉक्टर आणि तिच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. दरम्यानच्या काळात दोघांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आणि महिलेने डॉक्टरविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनीही गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी डॉक्टरच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती.
सुप्रीम कोर्टाने नुकताच याचिकेवर निकाल दिला आहे. न्या. ए के सिकरी आणि एस अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. ‘बलात्कार आणि संमतीने ठेवलेले शरीरसंबंध यात फरक असतो. अशा प्रकरणात सखोल चौकशी आवश्यक असते. आरोपी खरंच पीडितेशी लग्न करण्यास तयार होता किंवा त्याचा काही दुसराच हेतू होता आणि त्याने वासना शमवण्यासाठी लग्नाचे खोटे आश्वासन दिले होते जे फसवणुकीच्या अंतर्गत येते, असे कोर्टाने नमूद केले. या प्रकरणात स्त्री- पुरुषाने संमतीने शरीरसंबंध ठेवले होते आणि त्यामुळे हा बलात्कार ठरत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.



  Print






News - World | Posted : 2019-01-03






Related Photos