महत्वाच्या बातम्या

 चोरट्यांनी चक्क पोलीस ठाण्यासमोरील मंदिरातच केली चोरी : दानपेटी नेली चोरून


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन समोर असलेल्या कालभैरव मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. 

गुरुवारी रात्री उशिरानंतर चोरट्यांनी मंदिराचे दार तोडून ही चोरी केली. चोरट्यांनी मंदिरातील एक दानपेटी चोरून नेली व दुसरी दानपेटी फोडून पैसे लंपास केले.

आश्चर्याची बाब म्हणजे कोतवाली पोलीस ठाण्याच्या अगदी नजरेच्या टप्प्यात कालभैरव मंदिर आहे. शिवाय मंदिर दाटीवाटीची वस्ती आणि बाजारपेठेत आहे. तरीदेखील तेथे चोरी करण्याचे चोरट्यांनी पाऊल उचलल्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos