महत्वाच्या बातम्या

 नागपूर : ग्रामीण पोलिसांची अवैध दारू धंदा विरूद्ध विशेष मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पोलीस अधीक्षक विशाल आनंद नागपूर ग्रामीण यांनी दिलेल्या आदेशावरून नागपूर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक यांचे पथक तयार करून अवैध दारू संदर्भात विशेष मोहीम राबविण्यात आले.  

यामध्ये ०३ एप्रिल २०२३ ते १३ एप्रिल २०२३ पर्यंत जिल्हयातील विविध ठिकाणी अवैध दारू भट्टीवर छापे मारून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर तसेच भट्टीवर दारूबंदीच्या एकुण २३५ केसेस करण्यात आले. असुन आरोपीतांकडुन सुमारे ३० लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करून नाश करण्यात आला आहे. त्यामध्ये विशेष करून गोंडखैरी येथील कारवाईचा समावेश आहे. 

सदर कारवाई दरम्यान कच्चे रसायन सडवा, दारूभट्टीसाठी लागणारे एकुण साहित्य, दारू तयार करणेकामी लागणारे साहीत्य जप्त करून गावठी दारूच्या भट्टया उद्धवस्त करण्यात आले आहे. अशा प्रकारची मोहीम यापुढेही सतत चालु राहणार असल्याबाबत पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण विशाल आनंद यांनी सर्व ठाणेदारांना सांगितले आहे. 





  Print






News - Nagpur




Related Photos