महत्वाच्या बातम्या

 बेरोजगारी व महागाईच्या विरोधात : चंद्रपूर शहरात प्रदेश युवक काँग्रेसची भव्य मशाल पदयात्रा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : बेरोजगारी व महागाईच्या निषेधार्थ प्रदेश युवक काँग्रेस चंद्रपूरच्या वतीने भव्य मशाल रॅली काढून केंद्र सरकार व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मशाल रॅली काढण्यात आली.

माजी प्रदेश सरचिटणीस सचिन कात्याल यांच्या मार्गदर्शनाखाली व मशाल मोर्चाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इंजि.रमीज शेख, कुणाल चहारे, भानेश जंगम, शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडुर यांनी केले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस सुनीता लोढीया, अखिल भारतीय काँग्रेस सचिव शिव राव, माजी शहर अध्यक्ष नंदू नगरकर, संतोष लहमागे, महिला शहराध्यक्षा चंदा वैरागडे, बोबडे, गोपाल अमृतकर, संगीता अमृतकर, सेवादल जिल्हाध्यक्ष स्वाती त्रिवेदी, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष शफाक शेख, युवक काँग्रेस चे सूरज कन्नूर, राजीव खजांची, नौशाद शेख, काशिफ अली, प्रवीण लांडगे, शालिनी भगत, राहुल चौधरी, प्रशांत दानव, राजेश त्रिवेदी, भालचंद्र दानव, राजू वासेकर, विनोद वाघमारे, यश दत्तात्रय, राजेश वर्मा, आतिफ रजा, प्रीतम पाटणकर आदी पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गांधी चौकातून निघालेली मशाल पदयात्रा, आंबेडकर चौकातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मशाल रॅली जटपुरा गेट येथे येऊन जाहीर सभेने कार्यक्रमाची सांगता झाली. 

कार्यक्रमाच्या भाषणात प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तरूणांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याच बरोबर सत्तेचा वापर करून अदानीचे 20 हजार कोटी आले कुठून असा सवाल केला.

सूत्र संचालन युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस सचिन कात्याल यांनी केले, तर प्रदेश सचिव कुणाल चहारे यांनी भाजप हा ओबीसी विरोधी पक्ष असल्याचे वर्णन केले. जिल्हाध्यक्ष राजेश अडुर यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध केला.

सचिव इंजि. रमीज शेख यांनी फुले, शाहू, आंबेडकरी बहुजन तरुणांचे कृतज्ञता व्यक्त करून आपल्या हक्कासाठी वेळोवेळी रस्त्यावर येण्याचे आवाहन केले.






  Print






News - Chandrapur




Related Photos