महत्वाच्या बातम्या

 भाजपची महिला आघाडी सक्षम करण्यावर भर द्या : महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगीता पिपरे


- अहेरी येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीची तालुका बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी ही जगात एक नंबरची पार्टी झालेली असून या पार्टीचे आपण सदस्य आहोत याचा आपल्याला अभिमान असायला हवा या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश विकासाकडे अग्रेसित होत आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अनेक लोकाभिमुख योजना अमलात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेषता महिलांसाठी विविध योजना सुरू केले असून याचा प्रत्यक्ष लाभ महिलांना होत आहे. महिला आत्मनिर्भर व्हाव्या व स्वतः उद्योग सुरू करून दुसऱ्यांनाही त्यांना रोजगार देता यावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्न सुरू असून महिलांनी योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा तसेच भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजना सर्वसामान्य व शेवटच्या महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा व भाजपची महिला आघाडी सक्षम करण्यावर भर द्यावा असे प्रतिपादन महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीता पिपरे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीता पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी तालुका महिला आघाडी ची महत्वपुर्ण बैठक आज 13 एप्रिल रोजी पार पडली. या बैठकीला भाजप महिला आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, महिला आघाडीच्या गडचिरोली शहर अध्यक्षा कविता उरकुडे, भाजपच्या अहेरी तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्ली, अहेरी नगर पंचायतीच्या नगरसेविका शालिनी पोहनेकर, नगरसेविका लक्ष्मी मद्दीवार, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मालू तोडसाम, माजी तालुका अध्यक्ष किरण भांदककार, अरुणा गेडाम, अनिता मडावी, ममता उईके, गडचिरोली शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, शहर सचिव पूनम हेमके व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





  Print






News - Gadchiroli




Related Photos