गडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल्यांचा खात्मा, २९ जहाल नक्षल्यांना अटक


- १८ नक्षल्यांनी पोलीसांसमोर केले आत्मसमर्पण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
२०१८ हे वर्ष  गडचिरोली पोलीसांकरीता  सर्वात यशस्वी वर्ष  ठरले आहे.  या वर्षात पोलीस दलाने अत्यंत प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबवुन तब्बल ५० नक्षल्यांचा खात्मा करण्यात  यश संपादन केले  आहे.   सोबतच २९ जहाल नक्षल्यांना  अटक करण्यात आली असुन १८ नक्षल्यांना  पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या या उत्कृष्ट कामगीरीमुळे  २०१८  मध्ये जिल्ह्यातून जवळ - जवळ ९७ नक्षल्यांचा नायनाट केला आहे. त्याच बरोबर नक्षल्यांकडील हत्यारे, दारुगोळा जप्त करण्यात देखील पोलीस दलाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. महत्वाची बाब म्हणजे गडचिरोली पोलीस दलाची कसल्याही प्रकारची हानी अभियानादरम्यान झालेली नसुन अतिशय कौशल्यपूर्ण  अभियान राबवुन गडचिरोली पोलीस दलाने  उत्तुंग कामगिरी नोंदविली आहे. 
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या जवानांनी अतिशय खडतर अभियान राबवुन पोलीस दलाची मान फक्त राज्यातच नव्हे तर देशात उंचावली आहे. एकीकडे प्रभावीपणे नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना दुसरीकडे मोठया प्रमाणावर स्थानिक नागरिकांषी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करुन नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती करुन त्याचा लाभ करुन देण्यासाठी तसेच त्यांच्या मुलभुत समस्या जाणुन घेवून निराकरण करण्याकरीता विविध कार्यक्रम देखील पोलीस दलाने घेतलेले आहे. यामध्ये तब्बल २५२ जनजागरण मेळावे व ९६ जनसंपर्क कार्यक्रम, २००२ ग्रामभेटी घेण्यात आले. त्यामुळे प्रशासनाशी  नागरीकांचा प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होवुन स्थानिक जनतेचा विश्वास संपादन करुन जनतेची प्रशासनावरील विश्वासाची व आपुलकीची भावना वाढली. शैक्षणिक , आर्थिक, सामाजिक व औद्योगिक प्रगतीची माहिती होवुन त्याच्या मनातील नक्षल्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजना राबवुन १६३ मुले व १५३ मुली यामध्ये १२ नक्षल पिडीत पाल्य व ७  नक्षल्यांचे नातेवाईक असे एकुण ३१६ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दर्शन सहलीचा लाभ देण्यात आला. गडचिरोली जिल्हयातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देवुन जिल्हयातील आदीवासी बांधवाना मुख्य प्रवाहात समाविष्ट  करण्याच्या उद्देशाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करुन त्यातुन ८२४ सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. त्याच प्रमाणे जिल्हयातील युवक -युवतींना पोलीस तसेच अर्धसैनिक दलात नौकरीच्या संधी उपलब्ध होण्याकरीता पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असुन त्यापैकी पोलीस दलात ६७ व निमलष्करी  दलात १२ उमेदवारांची निवड झालेली आहे. जिल्हयातील नक्षल पिडीत व आत्मसमर्पीत नक्षल्यांच्या पाल्यांना नौकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याकरीता वेळोवेळी षासना सोबत पाठपुरावा केल्याने षासनाने नक्षल पिडीत पाल्यांना  शासकीय सेवेत सामावुन घेण्याबाबत परिपत्रक निर्गमीत केलेले आहे. तसेच ५२ नक्षल पिडीतांना राज्य परिवहन विभागात विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेली आहे. आदीवासी मुलां-मुलींच्या उज्वल भविश्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील इतर ठिकाणी झालेली शैक्षणिक , आर्थिक, सामाजिक व औदयोगिक प्रगतीची माहिती होवुन त्याच्या मनातील नक्षल्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजना राबवुन १६३ मुले व १५३ मुली यामध्ये १२ नक्षल पिडीत पाल्य व ७  नक्षल्यांचे नातेवाईक असे एकुण ३१६ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दर्शन सहलीचा लाभ देण्यात आला. आदिवासी युवकांच्या मनात खेळाविषयी  आवड निर्माण करून त्यांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या  उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्यावतीने बिरसा मुंडा व्हाॅलीबाॅल स्पर्धा व विर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा आयोजित करून  स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आदिवासींची संस्कृती जोपासण्यासाठी व समाजात मानाचे स्थान मिळवुन देण्यासाठी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन ‘आदिवासी विकास दौड’ चे आयोजन करून स्पर्धेतील विजेत्यांना प्रोत्साहनपर रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला. इतर सामाजिक परंपरेप्रमाणे आदिवासींचे विवाह करण्याच्या  उद्देशाने आदिवासी सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करून त्यात १०२  आदिवासी जोडप्यांचा  विवाह करून देण्यात येवुन प्रत्येक जोडप्यास घरगुती साहित्य व कपड्यांचे वाटप करण्यात आले. सर्व सामान्य नागरिकांच्या  दृष्टीने सुध्दा गडचिरोली पोलीस दलाने वेळोवेळी प्रभावी कामगिरी केलेली आहे. गडचिरोली पोलीसांनी श्रमदानातुन रस्ते तयार करणे, पुल तयार करणे यासारखे हितोपयोगी कामे त्याचप्रमाणे तरूणांना जगातील घडामोडीची माहिती होण्याच्या  दृष्टीने  नक्षलग्रस्त भागात मनोरंजन हाॅल तयार करून कोठी, भामरागड या सारख्या दुर्गम भागात सेटअप बाॅक्स, टिव्ही लावुन देण्यात आली. विद्यार्थ्यांमधील ऐक्याची  भावना वृद्दींगत करण्यासाठी सामाजिक सद्भावना परिक्षेचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील आदिवासी व सर्वसामान्य नागरीकांची हलाकीची परिस्थिती लक्षात घेता विविध पोलीस घटकांकडुन साहित्य प्राप्त करून दिवाळी निमित्य सदर कपडे, भांडी, स्टेशनरी साहित्य, दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करून पोलीसांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-02


Related Photos