महत्वाच्या बातम्या

 आरसेटीचे दहा दिवसीय मत्स्यपालन प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भारत सरकार, महाराष्ट्र शासन व बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा यांचे मार्फत निशुल्क मत्स्यपालनाचे दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम १७ एप्रिल २०२३ पासून सुरु होत आहे.

प्रशिक्षणामध्ये मत्स्यपालनांच्या पध्दती, पिंजरा पध्दत, तलावाची बांधणी, मासोड्यांचे खाद्य, मासोड्यांवरील रोग व त्याचे नियंत्रण, बिज उत्पादन, शासकीय योजना विषयी माहिती, कर्ज विषयक मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसायाची संधी, बाजार सर्वेक्षण, बँकेच्या योजना याबद्दल मार्गदर्शन दिले जाईल. प्रशिक्षण प्रवेशाकरीता आयोजित मुलाखतीसाठी येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधार कार्ड, मनरेगा कार्ड, सोबत आणणे आवश्यक आहे.

प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना जेवन, चहा, नाश्ता, राहणे आदींची सोय मोफत केली जाईल. स्वयरोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी असणारे वय १८ ते ४५ वर्ष, शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा बेरोजगार पुरुष, महिलांनी मुलाखतीकरीता १७ एप्रिलला सकाळी दहा वाजता बि.ओ.आई.स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, लालबहादुर शास्त्री (मनरो) शाळेच्या बाजूला, शास्त्री चौक, भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे निर्देशक मिलींद इंगळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९५११८७५९०८ किंवा ८६६९०२८४३३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.





  Print






News - Bhandara




Related Photos