आमच्या मुलाची आत्महत्या नसून हत्याच आहे


- खुन्याला अटक करण्याची आई - वडीलांची पत्रकार परिषदेतून मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
धानोरा तालुक्यातील चातगाव येथे २२ डिसेंबर रोजी भुपाल प्रभाकर डोकरमारे (१७) रा. सिंदेवाही ता. धानोरा हा सायंकाळी ७ वाजता गळफास लावलेल्या अवस्थेत संशयास्पदरित्या आढळून आला. मात्र त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे. यामुळे खुन्याला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी मृतकाच्या आई - वडीलांनी आरमोरी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे.
प्रभाकर डोकरमारे व आई दुर्गा डोकरमारे दिलेल्या माहितीनुसार भुपाल प्रभाकर डोकरमारे हा आपल्या काका - काकूंकडे मागीच चार वर्षांपासून धानोरा तालुक्यातील चातगाव येथे शिक्षण घेत होता. २२ डिसेंबर २०१८ रोजी त्याचे काकू - काका दत्तजयंतीच्या आध्यात्मिक कार्यक्रमासाठी बाहेर केले होते. यावेळी मृतक सायंकाळी ७ वाजता घरी कोणीही नसताना संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आला. 
भुपाल हा चातगाव येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. तो आपल्या काका - काकूंसोबत भावाच्या खोलीत राहत होता. घटनेच्या दिवशी मृतक राहत असलेल्या खोलीत गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. दरवाजा उघडाच होता. त्याचे मल विसर्जीत झालेले नव्हते. तोंडातून लाळसुध्दा खाली पडत नव्हती. मृतकाचे विर्यपतन झालेले नव्हते. गळफास लावलेली दोरी ज्या ठिकाणावरून फास लागतो तिथपर्यंत पोहचू शकत नव्हती. तसेच दोरी बाहेरून आणलेली होती. तसेच मृत व्यक्तीचा जीव गेल्यानंतर लगेच पोलिस घटनास्थळी पोहचले. घरातील कोणीही उपस्थित नसताना पंचनामा करून प्रेत खाली उतरविण्यात आले. त्यानंतर दोन ते तीन तासांनी पंचनामा करण्यात आला. यामुळे हा प्रकार संशयास्पद असल्याचे प्रभाकर डोकरमारे यांनी म्हटले आहे. 
ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी मृतकाचे काका - काकू उपस्थित नसतानासुध्दा त्यांच्या घर मालकीनने आपल्या मुलाशी भांडण केले. यावरून घरमालकीन व तिच्या साथीदारांनी आपल्या मुलाला जीवानिशी ठार मारले असून गुन्हेगारांवर खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात यावी, यामध्ये पोलिसांनीसुध्दा हयगय केली आहे. गुन्ह्याचा तपास सिबीआयकडे सोपविण्यात यावा अशी मागणी डोकरमारे यांनी केली आहे. 
याबाबत चातगाव पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक पोटे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी  या प्रकरणात आपण कोणतीही हयगय केली नसून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासाअंती गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती दिली.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-01-02






Related Photos