महत्वाच्या बातम्या

 जात पडताळणीसंबंधीत प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणूक २०२२-२३ मध्ये राखीव मतदार संघातून निवडणूक लढविणा-या इच्छुक उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी चे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात आले होते. आरक्षीत जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांच्या प्रकरणांची समितीने तपासणी केली असता त्यातील काही प्रकरणांमध्ये समितीने त्रृटी नोंदविलेल्या आहेत. अर्जदारांना निवडणुक आयोगाने दिलेला विहित अवधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करने आवश्यक आहे. त्यामुळे अर्जदारांना त्रृटीची पूर्तता करणेबाबत समितीसमक्ष उपस्थित राहून जात आणि अधिवासाचे मानीव दिनांकापुर्वीचे पुरावे सादर करावे.

जात प्रमाणपत्र पडताळणी नियम 2012 च्या उपनियम 18(5) नुसार अर्जदाराच्या प्रस्तावावर तीन महिण्याच्या आत किंवा जास्तीत जास्त पाच महिण्याच्या आत समितीने निर्णय घेण्याबाबतचे प्रावधान आहेत. अर्जदाराने विहित कालावधिमध्ये त्रृटीची पूर्तता न केल्यास संबंधीत प्रकरणामध्ये अंतीम निर्णय घेऊन प्रकरणे निकाली काढण्यात यईल अशा परिस्थितीत उमेदवाराला वैधानीत पदावरून खाली केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. अर्जदारांनी त्यांच्या प्रकरणामध्ये असलेल्या त्रृटीची पुर्तता लवकरात लवकर करून या विशेष मोहिमेचा लाभ घेण्याबाबत उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, भंडारा यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos