महत्वाच्या बातम्या

 प्रोत्साहनपर लाभ पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याबाबत जाहीर आवाहन


- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत २९ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सन २०१७- १८, सन २०१८-१९ व सन २०१९-२० या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त़ रु. ५० हजार रुपये पर्यंत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. या तीन वर्षापैकी शेवटच्या वर्षात जे कर्ज घेतलेले आहे. त्या वर्षाच्या कर्जाची मुददल रक्क़म विचारात घेतली जाणार आहे. 

या योजनेअंतर्गत जिल्हयातील जिल्हा मध्य़वर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बँका यांनी या योजनेत पात्र असलेल्या खातेदारांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरलेली आहे. या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट़ क्रमांकासह (V-K लिस्ट़) आजपावेतो एकुण ५ यादया प्रसिध्द झालेल्या असुन, विशिष्ट़ क्रमांकासहची यादी संबंधीत बँका, जिल्हा उपनिबंधक व तालुका सहाय्य़क निबंधक कार्यालयात तसेच गाव चावडी, ग्रामपंचायत, विकास संस्था येथे प्रसिध्द़ करण्यात आलेली आहे. विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिध्द़ झाल्यानंतर त्यातील शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणिकरण करावयाचे आहे. आधार प्रमाणिकरणानंतर पात्र लाभार्थ्यांची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम त्यांच्या बँकेच्या सेव्हिंग खात्यावर जमा होणार आहे. आधार प्रमाणिकरणासाठी गेल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्क़म चुकली असेल, तर त्याबाबत त्या शेतकऱ्याने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवावयाची आहे, अशा प्राप्त़ होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या तर तालुकास्त़रावर संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

तरी आज रोजी गडचिरोली जिल्हयातील तालुकानिहाय अहेरी ३५, आरमोरी ४५, भामरागड १३, चामोर्शी ८५, देसाईगंज ३५, धानोरा १३, एटापल्ली १५, गडचिरोली ३७, कोरची २, कुरखेडा २२, मुलचेरा ३९ व सिरोंचा ४८ असे एकुण ३८८ शेतकरी लाभार्थी यांनी आधार प्रमाणिकरण करणे शिल्लक आहे. तरी सदर तालुक्यातील लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण करुन घेणे आवश्यक असल्याने तालुक्यातील आपले सरकार/सी.एस.सी सेंटर/संग्राम केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे जाहिर आवाहन जिल्हाधिकारी, गडचिरोली व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गडचिरोली यांनी केलेले आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos