महत्वाच्या बातम्या

 मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती ईआर-१ मध्ये सादर करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२३


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष/स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस भरणे आवश्यक आहे. विहीत नमुना ईआर-१ मध्ये नियमितपणे महाराष्ट्र्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या या संकेतस्थळावरून ऑनलाईन पदधतीने सदर माहिती सादर करणे बंधनकारक असून अंतिम मुदत ३० एप्रिल २०२३ पर्यंत आहे. माहे-मार्च-२०२३ अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य्‍ विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.२, युनिट क्र.२ कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे ०१ एप्रिल २०२३ पासून सुरु झाले आहे. 

याकरिता १०० टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. तरी गडचिरोली जिल्हयातील महास्वयंम पोर्टलवर नोंदणी असलेल्या या कार्यालयाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करुन आपली अचूक माहिती ऑनलाईन पदधतीने सादर करावी.

सदरील माहे-मार्च २०२३ अखेरचे तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२३ आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी. हे तिमाही विवरण मुदतीत ऑनलाईन पदधतीने सादर करावे. प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र. २, युनिट क्र. २ कॉम्प्लेक्स, गडचिरोली या कार्यालयाने केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos