महत्वाच्या बातम्या

 गोंदिया जिल्हा परिषदेने केले कोरोना काळातील दुकानभाडे माफ


- रोजगार सृजन करणाऱ्यांना दिलासा देणे गरजेचे : जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले

- दुकानदारांना जिल्हा परिषदेचा दिलासा

- प्रतिवर्ष ऐवजी दर 3 वर्षांनी होणार भाडेवाढ

- दुकानदारांनी केले निर्णयाचे स्वागत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : जिल्हा परिषदेच्या मालकीचे पंचायत समिती स्तरावर असलेले दुकानगाळे पंचायत समिती स्तरावर भाड्याने देण्यात आलेले आहे. कोरोना काळात व्यापार ठप्प होता त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न दुकानदारांपुढे उभा झाला होता त्यामुळे परिवार चालवायचा कि दुकानभाडे भरायचे अशा इकडे आड तिडके विहीर परिस्तिथी दुकानदारांपुढे उभी झाली होती. कोरोनाकाळात भाड्यात सूट मिळावी यासाठी अनेक दुकानदारांनी मागणी केली होती. गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांना सुद्धा अनेकदा दुकानदारांनी निवेदन देऊन दिलासा देण्याची विनंती केली होती. यामुळे कोरोनाकाळातील दुकानभाडे माफ करण्याची बाब जिल्हा परिषदेच्या बैठकीत विचाराधीन घेतली जाईल असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी दिले होते.


११ एप्रिल २०२३ गोंदिया जिल्हा परिषदेच्या स्थाई समितीच्या बैठकीत दुकानदारांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला.  यात प्रामुख्याने एकरकमी समझोता करणाऱ्या दुकानदारांना १२ महिन्यांचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या दुकानदारांनी नियमित भाडे भरले आहे त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. त्यांचे भाडे पुढील देयकांमधून वजा करण्यात येईल. काही दुकानांचे भाडे ३ हजार व २ हजार असून दरवर्षी ५ टक्के भाडेवाढ करण्यात येते. सोबतच २०१९ पासून कसलीही भाडेवाढ करण्यात आली नव्हती म्हणून १ मे २०२३ पासून १० % भाडेवाढ करण्यात येईल व त्यानंतर थेट ३ वर्षांनी १० टक्के भाडेवाढ करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.


दुकानदारांनी केले निर्णयाचे स्वागत

कोरोनाकाळात व्यापार ठप्प होता त्यामुळे उदरनिर्वाह कसा चालवायचा हा प्रश्न पुढे असतांना दुकानभाडे कसे भरायचे हा प्रश्न देखील दुकानदारांना भेडसावत होता. यामुळे व्यापार करणे कठीण झाले होते. सादर विषयावर दिलासा देण्याबाबत विनंती दुकानदारांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. जिल्हा परिषदेने १२ महिन्याचे भाडे माफ केल्यामुळे तसेच भाडेवाढ मध्ये दिलासा देऊन मागणी मान्य केल्या बद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांचे अभिनंदन केले आहे. 





  Print






News - Gondia




Related Photos