महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व्दारा जिल्हयातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे : खासदार रामदास तडस


- वर्धा येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आढावा बैठक संपन्न

- वर्धा जिल्हयाला ५० बसेस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : यवतमाळ ते नागपूर मार्गावरील देवळी, केळझर, सालोड, सेलु येथील येणाऱ्या येणाऱ्या बसेस बसस्थानकावर न जाता परस्पर पुलावर थांबून प्रवाश्यांना उतरुन दिल्या जाते, त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो, नागपूर ते यवतमाळ मार्गावरील सर्व बसेस गावातील बसस्थानकावर थांबेल अशी व्यवस्था करावी, प्रवाश्यांना कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच जिल्हयातील प्रलंबीत प्रश्न तातडीने सोडवावे व देवळी येथील बसस्थानकाचे रखडलेले कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या सुचना खासदार रामदास तडस यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या व सेलू येथील बसस्थानकाचे काम चांगल्या प्रतीचे झाल्याबद्दल अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

वर्धा येथील जनसंपर्क कार्यालयात खासदार रामदास तडस यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली बैठकीमध्ये पुलगांव येथील नविन बसस्थानकाचा आराखडा, पुलगांव ते वर्धा सालोड मार्ग बससेवा पुर्ववत सुरु करणे, वर्धा जिल्हयात नविन बसेस मिळण्याकरिता उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना ५० बसेसची मागणी केली होती, त्यानुसार ५० बसेसची सद्यस्थिती, देवळी येथील बसस्थानक कामाच्या प्रगतीबाबत व इतर विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विभाग नियंत्रक रा.प. वर्धा संदीप शरदराव रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी विजय धायडे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य सुधिर सुभाष गुल्हाने उपस्थित होते.

यावेळी पुलगांव येथील नुतन बसस्थानकाचा आराखडा तयार केलेला असुन मंजुरी करीता सादर केलेला आहे. देवळी येथील काम तातडीने पुर्ण करण्यात येईल तसेच नागपूर-यवतमाळ मार्गावरील सर्व बसेस मार्गावरील बसस्थानकावर जाईल. याची दक्षता घेण्यात येईल तसेच वर्धा जिल्हाला आपण मागणी केल्यानुसार वर्धा जिल्हयाला ५० बसेसची मंजुरी मिळाली असुन १० बसेस उपलब्ध झाल्या असल्याचे यावेळी उपस्थीत अधिकाऱ्यांनी सांगीतले.





  Print






News - Wardha




Related Photos