महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१२ एप्रिल महत्वाच्या घटना

१६०६ : ग्रेट ब्रिटनने यूनियन जॅक ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.

१९३५ : प्रभात चा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९४५ : अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.

१९६१  : रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिला अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

१९६७ : कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले.

१९९७ : भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.

१९९७ : पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.

१९९८ : सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.

२००९ : झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.

१२ एप्रिल जन्म

५९९ : ५९९ ई.पुर्व : जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.

१३८२ : मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग यांचा जन्म.

१८७१ : लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९३०)

१९१० : सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८०)

१९१४ : संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९५)

१९१७ : सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७८)

१९३२ : श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचा जन्म.

१९४३ : केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन यांचा जन्म.

१९५४ : मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८९)

१९८८ : SEBI ची स्थापना

१२ एप्रिल मृत्यू

१७२० : बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १६६२)

१८१७ : फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचे निधन. (जन्म: २६ जून १७३०)

१९०६ : महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८३६)

१९१२ : अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक कारा बार्टन यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८२१)

१९४५ : अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १८८२)

२००१ : NASSCOM चे अध्यक्ष देवांग मेहता यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९६०)

२००१ : स्माईली चे जनक हार्वे बॉल यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९२१)

२००१ : हिंदकेसरी पै. चंबा मुत्‍नाळ यांचे निधन.

२००६ : कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक राजकुमार यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९२९)





  Print






News - todayspecialdays




Related Photos