जम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशातील दोघांचा खात्मा


वृत्तसंस्था /  श्रीनगर :  जम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशातील दोघांचा भारतीय जवानांनी खात्मा केला आहे. दोघेही पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीमचे (BAT) कमांडो होते आणि भारतीय लष्करावर हल्ल्याचा त्यांचा कट होता, असं सांगितलं जातं. 
घुसखोरांकडील स्फोटकांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. त्यावर पाकिस्तानचं चिन्ह होतं. या दोघांनी पाकिस्तानी लष्कराचे गणवेश परिधान केले होते. भारतीय हद्दीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असतानाच, जवानांनी त्यांचा खात्मा केला. सूत्रांनुसार, घुसखोरीवेळी त्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. घुसखोरांचे मृतदेह पाकिस्तानच्या ताब्यात दिले जातील. त्यासाठी पाकिस्तानशी संपर्क साधणार आहोत, असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं.   Print


News - World | Posted : 2018-12-31


Related Photos