एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार सहा महिन्यांची बालसंगोपन रजा, पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळू शकेल रजा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना  सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. महिला कर्मचारी, पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी तसेच ज्या कर्मचाऱ्यांची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यांना  ही रजा मिळू शकेल. पहिल्या दोन मुलांसाठी ही रजा घेता येणार असून एका वर्षात जास्तीत जास्त दोन महिन्यांची रजा घेण्याची मुभा आहे.
एसटी महामंडळाने महिला कर्मचा-यांना प्रसूती काळात सहाऐवजी नऊ महिन्यांची रजा देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. या निर्णयाचा पुढचा कौटुंबिक टप्पा म्हणून आता महिला कर्मचाऱ्यांना  बालसंगोपन रजाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरी करताना कुटुंबाकडे लक्ष देणे अवघड बनते.  एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना  सहा महिने म्हणजेच १८० दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रावते म्हणाले.
महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणावर महिलांची भरती केली आहे. वाहक पदासह विविध पदांवर महामंडळात मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी आहेत. यात ग्रामीण भागातील मुलींची संख्या मोठी असून महामंडळाच्या नोकरीमुळे महिला कर्मचाºयांच्या कुटुंबाच्या आर्थिक सक्षमीकरणास मोठा हातभार लागत असल्याचेही रावते म्हणाले.   Print


News - Rajy | Posted : 2018-12-31


Related Photos