महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे कोल्हापूर संघाला विजेतेपद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पुणे  :
महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर संघाने वर्चस्व गाजवून सर्वसाधारण विजेतेपदाचा सलग दुसर्‍यांदा मान मिळविला. प्रादेशिक संचालक  संजय ताकसांडे यांच्याहस्ते विजेत्या संघाला करंडक प्रदान करण्यात आला.
स्वारगेट येथील कै. बाबुराव सणस क्रीडांगणावर शनिवारी (दि. 29) रात्री 7 वाजता तीन दिवसीय स्पर्धेचा समारोप झाला. सर्वाधिक 38 गुण मिळविणाऱ्या कोल्हापूर संघाने सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक पटकाविला. महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्याहस्ते हा करंडक कोल्हापूर संघाला प्रदान करण्यात आला. यावेळी इतर संघ व उपस्थितांनी सुद्धा टाळ्यांचा गजर व जल्लोष करीत कोल्हापूर संघाचे कौतुक केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार (पुणे), श्री. अनिल भोसले (कोल्हापूर), श्री. सुनील पावडे (बारामती), श्री.भूजंग खंदारे (मुख्यालय), श्री. शंकर तायडे (गुणवत्ता नियंत्रण) अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, राजेंद्र पवार, पंकज तगलपल्लेवार, अंकुर कावळे, भाऊसाहेब इवरे, वादिराज जहागिरदार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक खेळातील विजेत्या व उपविजेत्यांना सुवर्ण व रौप्यपदक तसेच प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कमलाकर चौधरी व सौ. मृदुला शिवदे यांनी केले व सौ. सारिका सातपुते यांनी आभार मानले.
राज्यातील 16 परिमंडलाचे औरंगाबाद (जळगाव), लातूर (नांदेड), कल्याण (नाशिक), सांघिक कार्यालय (भांडूप व रत्नागिरी), नागपूर (चंद्गपूर व गोंदिया), अकोला (अमरावती), पुणे (बारामती) व कोल्हापूर अशा 8 संयुक्त संघांतील 592 पुरुष व 176 महिला असे एकूण 768 खेळाडू या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेतील विविध सामन्यांचे अंतिम निकाल पुढीलप्रमाणे.

सांघिक खेळांचे अंतिम निकाल - अनुक्रमे विजेता व उपविजेता : क्रिकेट - कल्याण व नागपूर संघ, व्हॉलिबॉल - पुणे व कोल्हापूर संघ, कबड्डी - सांघिक कार्यालय व कोल्हापूर संघ, बॅडमिंटन - नागपूर व कोल्हापूर संघ, टेबल टेनिस - सांघिक कार्यालय व नागपूर संघ, मैदानी स्पर्धा - कोल्हापूर संघ व संयुक्तपणे औरंगाबाद - पुणे संघ, कुस्ती - कोल्हापूर व पुणे संघ, 4 बाय 100 रिले - पुरुष गट पुणे व सांघिक संघ, महिला गट - सांघिक कार्यालय व नागपूर संघ.
वैयक्तिक खेळांचे अंतिम निकाल (कंसात संघ) -अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे - 100 मीटर धावणे - पुरुष गट - 1) गुलाबसिंग वसावे (पुणे) व शेख जाकिर अली (लातूर), महिला गट - प्रिया पाटील (सांघिक कार्यालय) व सरिता सरोटे (नागपूर), 200 मीटर धावणे - पुरुष गट - संकेत वाकडे (औरंगाबाद) व महेंद्ग पाटील (नागपूर), महिला गट - प्रिया पाटील (सांघिक कार्यालय) व सरिता सरोटे (नागपूर), 400 मीटर धावणे - पुरुष गट - गुलाबसिंग वसावे (पुणे) व विराज कोमटेकर (सांघिक), महिला गट - प्रिया पाटील (सांघिक कार्यालय) व श्वेतांबरी अंबाडे (नागपूर), 800 मीटर धावणे - पुरुष गट - अरविंद कोठेकर (सांघिक कार्यालय) व मोहन मोरे (कल्याण), महिला गट - प्रिया पाटील (सांघिक कार्यालय) व पुजा ऐनापुरे (कोल्हापूर), उंच उडी - पुरुष गट - चेतन केदार (औरंगाबाद) व महादेव जाधव (कोल्हापूर), महिला गट - सरिता सरोटे (नागपूर) व अश्विनी देसाई (कोल्हापूर), लांब उडी - पुरुष गट - नीलेश वैद्य (अकोला) व शुभम निंबाळकर (कोल्हापूर), महिला गट - सरिता सरोटे (नागपूर) व माया येवंडे (पुणे), गोळा फेक - पुरुष गट प्रवीण बोरावके (पुणे) व हणमंत कदम (कोल्हापूर), महिला गट - पुजा ऐनापुरे (कोल्हापूर) व स्नेहा सपकाळ (सांघिक कार्यालय), थाळी फेक - पुरुष गट - तुषार अहेर (कल्याण) व महादेव मेटकरी (कोल्हापूर), महिला गट - हिना कुंगे (सांघिक कार्यालय) व पुजा ऐनापुरे (कोल्हापूर), भाला फेक - पुरुष गट - भारत उकालकर (औरंगाबाद) व रघुनाथ परदेशी (सांघिक कार्यालय), महिला गट - अश्विनी जाधव (पुणे) व सरिता सरोटे (नागपूर), बॅडमिंटन -पुरुष एकेरी - भारत वसिष्ठ (कल्याण) व पंकज पाठक (लातूर), पुरुष दुहेरी - भारत वसिष्ठ - प्रशांत चव्हाण (लातूर) व प्रफुल्ल लांडे-प्रशांत काकडे (नागपूर), महिला एकेरी - अनिता कुलकर्णी (पुणे) व प्रज्ञा वंजारी (नागपूर), महिला दुहेरी - वीणा सगदेव-मनीषा चोक्सी (नागपूर) व कमलरुख दारुखानवाला-निशा पाटील (पुणे), टेबल टेनिस - पुरुष एकेरी - राजेश चांदणे (कोल्हापूर) व रितेश सव्वालाखे (नागपूर), पुरुष दुहेरी - रितेश सव्वालाखे - प्रमोद मेश्राम (नागपूर) व सागर मटकरी - बी. बी. खंदारे (सांघिक कार्यालय), महिला एकेरी - छाया कांबळे (सांघिक कार्यालय) व वंदना देवपुजारी (नागपूर), बुध्दीबळ - पुरुष गट - नीलेश बनकर (नागपूर) व सौरभ माळी (अकोला), महिला गट - ऋुतुजा तारे (पुणे) व रश्मी पाटील (कोल्हापूर) कॅरम - पुरुष एकेरी - अनंत गायत्री (सांघिक कार्यालय) व अनिकेत बैसारे (नागपूर), पुरुष दुहेरी - अनंत गायत्री - विनोद गोसावी (सांघिक कार्यालय) व सुधीर पाटील - अनिकेत बैसारे (नागपूर), महिला एकेरी - पुष्पलता हेडाऊ (नागपूर) व तेजस्वी गायकवाड (सांघिक कार्यालय), महिला दुहेरी - तेजस्वी गायकवाड - प्रियांका उबाळे (सांघिक कार्यालय) व विजया माळी - स्नेहल घारगे (कोल्हापूर), ब्रिज- उल्हास लिमये- प्रशांत गोंधळेकर (सांघिक कार्यालय) व वैभव थोरात-एम. आर. बांधे (नागपूर), टेनिक्वाईट - महिला एकेरी - प्रियांका उगले (सांघिक कार्यालय) व शितल नाईक (पुणे), महिला दुहेरी - प्रिया पाटील - सायली कांबळे (सांघिक कार्यालय) व मंजुषा पालकर-स्नेहल घारगे (कोल्हापूर), कुस्ती - 57 किलो - गोरख रंगे (कोल्हापूर) व आकाश लिंभोरे (पुणे), 61 किलो - विनोद गायकवाड (अकोला) व सतीश म्हात्रे (कल्याण), 65 किलो - राजकुमार काळे (पुणे) व कैलास घोलवे (नागपूर), 70 किलो - चंद्रकांत दरेकार (पुणे), ज्योतिबा आऊलकर (कोल्हापूर), 74 किलो - संदीप नेवारे (अकोला) व जयकुमार तळेगावकर (लातूर), 79 किलो - युवराज निकम (कोल्हापूर) व महादेव दहिफळे (लातूर), 86 किलो - संदीप सावंत (कोल्हापूर) व महादेव कोसरे (नागपूर), 92 किलो - हसनुद्दिन शेख (अकोला) व शशिकांत कुंभार (कोल्हापूर), 97 किलो - प्रमोद ढेरे (कोल्हापूर) व महेश कोळी (पुणे) आणि 125 किलो - हणमंत कदम (कोल्हापूर) व दीपक गुंड (कल्याण).  Print


News - Rajy | Posted : 2018-12-30


Related Photos