महत्वाच्या बातम्या

 जागतिक आरोग्य दिनानिमित्त सुंदर माझा दवाखाना उपक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य या थीम सोबत प्राथमिक आरोग्य केंद्र बोधली येथे 7 एप्रिल 2023 रोजी सुंदर माझा दवाखाना उपक्रम जागतिक आरोग्य दिना निमित्त राबविण्यात आला. सदर कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रम डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला.

या कार्यक्रमला डॉ. संजय जठार अति. जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, डॉ. रुपेश पेंदाम, डॉ, सचिन हेमके, डॉ. राहुल थिगडे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. दीक्षांत मेश्राम, व रचना फुलझेले आर.के. एस. समन्वयक तसेच ग्रामपंचायत बोधली येथील सरपंच आकाश निकोडे, उपसरपंच मनीषा कुणघाडकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण करेवार तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र बोधली येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.

डॉ.करेवार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बोधली यांनी उदघाटन कार्यक्रमचे प्रस्ताविक केले. यात त्यांनी सुंदर माझा दवाखाना ठेवण्यासाठी 7 ते 14 या कालावधी आरोग्य केंद्रात विविध उपक्रम राबवून आरोग्य केंद्र स्वच्छ व सुंदर बनविण्यात येणार असे सांगितले. डॉ. संजय जठार यांनी आरोग्य सेवा ही सर्वानसाठी समान दर्जेदार सेवा उपलब्ध सर्वांसाठी करण्यात येणार आहे अशी माहीती दिली. सरपंच अशोक निकोडे यांनी गावाकडून तसेच ग्रामपंचायत मधून सुंदर माझा दवाखाना हे उपक्रम राबविण्याकरीता सहकार्य करण्यात येणार असे सांगितले.

डॉ. दावल साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त 7 एप्रिल पासून सुंदर माझा दवाखाना उपक्रम जिल्यातील सर्व आरोग्य संस्था मध्ये राबविण्यात येणार आहे, असे कळविले आहे. या उपक्रमामध्ये सर्व आरोग्य केंद्राची स्वच्छता, व आरोग्य सेवा सर्व सामान्य लोकांना मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी दिली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos