महत्वाच्या बातम्या

 वर्धा : भिडी व परिसरातील शेतकऱ्यांसाठी सामूहिक शेडनेट प्रकल्प


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : विदर्भातील शेतकऱ्यांना समृध्द करण्याच्यादृष्टीने हरितगृहाची उभारणी हा एक महत्वाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. भिडी परिसरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन व सहाय्याने सामुहिकपणे या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचा नुकताच शुभारंभ झाला.

शुभारंभ प्रसंगी सुधीर दिवे, रियाज अली सय्यद, भिडीचे सरपंच सचिन बिरे, उपसरपंच अतुल खेत्री, जामनी साखर कारखान्याचे संचालक अजय झाडे तसेच भिडी शेडनेट उत्पादक शेतकरी समूहाचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य उपस्थित होते. संबंधित गावांचे लाभधारक शेतकरी, सरपंच यांच्यासमवेत दिवे यांच्या उपस्थितीत भिडी येथे प्रकल्प उभारणीबाबत सभा पार पडली. शेडनेट उभारणी लवकरात लवकर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी दिवे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शेडनेटचे काम सुरू करावे, अशा सुचना केल्या. उभारणीचे काम करत असताना प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी जातीने लक्ष देणे फार गरजेचे आहे. हे काम शेतकऱ्याचे स्वतःचे आहे, त्यामुळे शेडनेट उभारणीचे काम उत्तम पध्दतीने आणि लवकर करावे, अशा त्यांनी केल्या. हरितगृहाची उभारणी करत असताना घ्यावयाची काळजी व भविष्यातील नियोजन याबाबत देखील चर्चा करण्यात आली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या प्रकल्पाला मार्गदर्शन व मदत करीत आहेत. तसेच रियाज अली सय्यद शेतकरी वर्गाला गाव पातळीवर आवश्यक तांत्रिक सहकार्य करीत आहेत. शेतकऱ्यांना बॅंक लोन व आर्थिक मदतीतून हा प्रकल्प पुर्णत्वास जाणार आहे. भिडीसह शिरपुर, अकोली, हुरदानपुर येथील शेतकऱ्यांना शेडनेटचा लाभ होईल. शेडनेटमुळे शाश्वत कृषी उत्पन्न घेणे शेतकऱ्यांना सोईचे होणार आहे. पाजीपाला पिकांसाठी शेडनेट अतिशय उपयुक्त असल्याचे पोकराचे प्रकल्प विशेषज्ञ प्रशांत साठे यांनी सांगितले.





  Print






News - Wardha




Related Photos