राज्यात ४८ हजार ५६१ शाळा प्रगत तर ६६ हजार ४५८ शाळा झाल्या डिजिटल


- शिक्षण विभागाची माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत  राज्यात एकूण ४८ हजार ५६१ प्रगत शाळा आहेत. तर ६६ हजार ४५८ डिजिटल शाळांची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती  शिक्षण विभागाने दिली आहे.  यामध्ये ज्ञानरचनावादी पद्धतीचा अवलंब करणाऱ्या शाळांची संख्या ६७ हजार ८२७ इतकी आहे. २०१८ या   वर्षात १ लाख ७० हजार तंत्रस्नेही शिक्षक तयार झालेत.  यासोबतच इंग्रजी माध्यमाचे ३४ हजार  विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांकडे वळले आहेत.  
 राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी तयार केलेल्या शैक्षणिक अ‍ॅप्सची संख्या ४ हजार ३७९ इतकी असून त्यांनी तयार केलेले ब्लॉग / संकेतस्थळांची संख्या ६ हजार ४३७ इतकी आहे. शिक्षण विभागाने शिक्षकांना प्रशिक्षणाची मागणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर राज्यातील तब्ब्ल ५ लाख २१ हजार शिक्षकांनी निरनिराळ्या विषयांच्या प्रशिक्षणाबाबत मागणी केली आहे.  जलदगतीने शिक्षण व स्पोकन इंग्रजीमुळे सुमारे ३४ हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यम शाळेत दाखल झाल्याची माहितीही शिक्षण विभागाने दिली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना, राज्य मुक्त मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर परीक्षा देण्याऐवजी त्या स्तरावरील अभ्याक्रम महाराष्ट्रातच सुरू झाल्यास तो विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षमपणे टिकू शकेल या हेतूने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ व अभ्याक्रम तयार करण्यात आला आहे. मंडळाच्या नियामक सदस्यांमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक, स्वरूप संपत, सुलेखनकार अच्युत पालव आदींचा समावेश आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-12-30


Related Photos