गडचिरोली जिल्ह्यात प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्याची संधी, रूग्णांना मिळणार स्वस्तात औषधे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील आरोग्य सुविधा आधीच खिळखिळी आहे. अशातच ग्रामीण आणि दुर्गम भागातील रूग्णांना आर्थिक परिस्थितीअभावी महागडी औषधे खरेदी करतांना ओढाताण करावी लागते. यामुळे देशभरातील रूग्णांना स्वस्तात औषधे मिळावी यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातसुध्दा औषधी दुकान सुरू करण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे इच्छूकांनी आवेदन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेचे नोडल अधिकारी अन्वय बक्षी यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात एकही जनऔषधी केंद्र नाही. यामुळे रूग्णांना महागडे औषधे खरेदी करावी लागतात. औषधांच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च हा सर्वसामान्यांना माहित नाही. यामुळे औषधी दुकानदारांकडून दिल्या जाणाऱ्या किमतीतच औषधे खरेदी करावे लागतात. हिच औषधे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत सुरू करण्यात येत असलेल्या औषधी दुकानातून स्वस्तात उपलब्ध होवू शकतात. गडचिरोली जिल्ह्यात औषधी दुकान सुरू करण्यासाठी इच्छूकांनी janaushadhi.gov.in या वेबसाईटवर जावून ऑनलाईन आवेदन सादर करावे, असे आवाहन अन्वय बक्षी यांनी केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-29


Related Photos