महत्वाच्या बातम्या

 पोलीस कर्मचाऱ्यांच्या समय सुचकतेने वरोरा शहरातील मोठी दुर्घटना टळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वरोरा : वरोरा पोलीस स्टेशन वरोराचे पोलीस कर्मचारी वरोरा शहरात रात्र गस्त घालित होते. एका घरातून मोठ्या प्रमाणात धुवा निघताना दिसला त्यांनी त्या घराकडे धाव घेतली घरातील कुटुंब झोपून होते. त्यांना उठविले तर घरात आग लागली होती. पोलीस कर्मचारी व कुटुंबीयांनी आगीवर  नियंत्रण मिळवले त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळल्याचे मानले जात आहे. 

वरोरा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नजीक शेख मुनार शेख चांद यांचे घर आहे घरातील सर्व व्यक्तीझोपेत होते. आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास या घरातून धुवा निघत असल्याचे गस्तीवर असलेले कपिल भंडारवार मोहन निषाद रंगराव पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांना दिसून आले.  त्यांनी घराकडे धाव घेतली घरातील इसम झोपेत असल्याने त्यांना आग लागल्याची माहिती नव्हती पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना उठवले, दार उघडताच आग दिसून आली घरातील कुटुंबियांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळाले म्हणून पुढील अनर्थ टळल्याचे मानले जातात या परिसरात दाट वस्ती असून पहाटे वारासुरू होता. त्यामुळे आग पसरले गेली असती परंतु पोलीस कर्मचाऱ्यांनी समय सूचकता दाखविल्याने एक मोठी दुर्घटना टळली या पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.  





  Print






News - Chandrapur




Related Photos