आरमोरी नगरपरिषद येथील सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली : राज्य निवडणूक आयोगानी गडचिरोली जिल्हयातील नगर परिषद, आरमोरी येथील सार्वत्रिक निवडणूक २०१८-१९ कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार नगर परिषद, आरमोरी या नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार असून या नगर परिषदेचे निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दिनांक २ जानेवारी २०१९ (बुधवार) ते ९ जानेवारी (बुधवार) (रविवार दि.६/०१/२०१९ रोजीचे सुटीच्या दिवशी नामनिर्देशन पत्रे देण्यात येणार नाहीत व स्वीकारली जाणार नाही ) या कालावधीत सकाळी ११ ते ३ वाजेपर्यत नगर परिषद, आरमोरी येथे स्विकारण्यांत येतील. नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक १० जानेवारी (गुरुवार) ला सकाळी ११ वाजेपासून करण्यात येईल व मतदानाचा कालावधी दिनांक २७ जानेवारी (रविवार) वेळ सकाळी ७. ३० पासून ते सायंकाळी ५.३० पर्यत राहील तसेच मतमोजणी व निकाल दिनांक २८ जानेवारी (सोमवार) सकाळी १० वाजल्यापासून तहसिल कार्यालय आरमोरी यथे करण्यात येईल. उपरोक्त निवडणूकीसाठी निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या प्रत्येक व्यक्तिसाठी आपले नामनिर्देशनपत्र https//panchayatelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यांत आले आहे. तरी उमेदवारांनी संकेतस्थळावर दिलेल्या नामनिर्देशनपत्र व घोषणापत्राचा नमुना भरुन त्यांचे प्रिंट आऊट घेऊन त्यावर स्वाक्षरी करावी व स्वाक्षरी केलेली प्रिंट आऊट नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र म्हणून उमेदवाराने नगर परिषद, आरमोरी येथे संबधित निवडणूक निर्णय अधिकारी,तथा उपविभागीय अधिकारी,देसाईगंज यांचेकडे विहीत वेळेत व विहीत पध्दतीने दाखल करावे. सार्वत्रिक निवडणूक असलेल्या आरमोरी नगर परिषद क्षेत्रात दिनांक २७ डिसेंबर २०१८ चे रात्री १२ वाजेपासून ते निवडणूक निकाल जाहीर होईपर्यत आचारसंहिता अंमलात राहील. आचार संहिते मधिल तरतूदीचे सर्वतोपरी पालन होईल, याची संबधितांनी दक्षता घ्यावी. नगर परिषद स्तरावरील लोकशाही बळकट करणेसाठी या निवडणूकीत सर्व मतदारांनी मतदान करावे. असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे कडून आवाहन करण्यात येत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-29


Related Photos