एटापल्ली येथील जि.प. च्या माध्यमातून विज्ञान महाविद्यालय सुरू करा


- विद्यार्थ्यांचे तहसीलदारामार्फत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली  :
तालुका मुख्यालयी असलेल्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखा सुरू करण्यात यावी तसेच अन्य मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी तहसीलदारामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन तसेच साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जि.प. कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे अर्थशास्त्र विषयाच्या शिक्षकाचे पद भरावे, बंद केलेले माॅडेल स्कूल पुन्हा सुरू करण्यात यावे, वनविभागाच्या अधिकारातील बागेचे सुशोभीकरण करण्यात यावे, आलापल्ली - कसनसूर मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास २ जानेवारी पासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-29


Related Photos