महत्वाच्या बातम्या

 विवाह सोहळ्यात नवरदेवाने केली हत्या : नवरदेवसह ९ जणांना जन्मठेपची शिक्षा


- चंद्रपूर मधील बाबूपेठ जूनोना चौक येथील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : लग्नानंतर धूमधडाक्यात स्वागत समारंभ सुरू असतानाच चक्क नवरदेवानेच वाद उकरून काढत एका दाम्पत्याशी भांडण करुन त्याची हत्या केल्याची घटना चंद्रपूर येथील बाबुपेठ जुनोना चौक विक्तुबाबा मंदिर जवळ झाली होती. या प्रकरणी ९ जणांना जन्मठेपची शिक्षा झाली आहे.

लग्नानंतर धूमधडाक्यात स्वागत समारंभ सुरू असतानाच चक्क नवरदेवानेच वाद उकरून काढत एका दाम्पत्याशी भांडण करुन हत्या केली होती. नवरदेवाला राग इतका अनावर झाला की, त्याने आपल्या सहकाऱ्यांसह त्या दाम्पत्याला काठी, कुऱ्हाड व जांबिया तलवारीने बेदम मारहाण केली. यात पती संतोषसिंह टाक यांचा मृत्यू झाला. तर पत्नी रिनाकौर संतोषसिंह टाक या जखमी झाल्या होत्या. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने न्यायालयीन लढाई लढली अन् ती जिंकलीही. चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश जी. भालचंद्र यांनी हत्येच्या गुन्ह्यातील नऊही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व ८ हजार ५०० रुपयांचा दंड व सहकलम अंतर्गत १ ते ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

आरोपी करणसिंग टाक (२२), आचीसिंग सबजितसिंग टाक (३६), सगतसिंग देवीसिंग बावरी (३२), भीमसिंग सबजितसिंग टाक (२६), विक्रमसिंग सबजितसिंग टाक, बलदेवसिंग सबजितसिंग टाक (४०), सबजितसिंग टाक सर्व रा. चंद्रपूर असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर कविताकौर बावरी व सतकौर सबजितसिंग टाक या दोघांचा मृत्यू झाला आहे.

बाबूपेठ येथील जुनोना चौक विक्तूबाबा मंदिराजवळ ११ जून २०१८ रोजी आरोपी करणसिंग टाक याच्या विवाहाचा स्वागत समारंभ सुरू होता. या स्वागत समारंभात आरोपी करणसिंग टाक याने सहकाऱ्यांच्या मदतीने जुन्या वादातून भांडण करत संतोषसिंह टाक व त्याची पत्नी रिनाकौर संतोषसिंह टाक या दाम्पत्याला जांबिया तलवार व कुन्हाड, काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत संतोषसिंह टाक यांचा मृत्यू झाला, तर पत्नी रिनाकौर गंभीर जखमी झाल्या होत्या.

याप्रकरणी रिनकौर यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध कलम ३०२, ३०७, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ३४१ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तक्रारीच्या आधारावर पोलिस उपनिरीक्षक व्ही. बी. मोरे यांनी तपास करत सर्व आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश जी. भालचंद्र यांनी नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा, ८ हजार ५०० रुपयांचा दंड व सहकलम अंतर्गत १ ते ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी वकील म्हणून ॲड. संदीप नागापुरे यांनी काम पाहिले.





  Print






News - Chandrapur




Related Photos