२२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान नागपुरात ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन  नागपूरमध्ये २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. मुंबईत झालेल्या  नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.  
 यावर्षी नाट्य संमेलनासाठी ९ प्रस्ताव आले होते. त्यापैकी सात स्थळांनी प्रस्ताव आधीच मागे घेतले. त्यामुळे लातूर आणि नागपूर अशी दोन स्थळे स्पर्धेत होती. आज गुरुवारी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत  नागपूरवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखा या संमेलनाचे आयोजन करणार आहे. 
विदर्भात यापूर्वी १९१२ मो.वि. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीला, १९३९ मध्ये कारखानीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला, १९६२ मध्ये शं.नी. चाफेकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला, १९७५ मध्ये भालचंद्र पेंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळला, १९८२ मध्ये पं. वसंतराव देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्याला आणि १९८५ मध्ये प्रभाकर पणशीकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला संमेलन झाले होते. आता १९८५ नंतर विदर्भात २२ ते २५ फेब्रुवारी २०१९ मध्ये ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली ३३ वर्षांनंतर नाट्य संमेलन होत आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2018-12-28


Related Photos