जीएसटी कंत्राटीकर्मचाऱ्यांना थकीत वेतन द्या : सुधीर मुनगंटीवार


- म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 विशेष प्रतिनिधी / मुंबई :
कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याबाबत जीएसटी आयुक्तांना सूचना अर्थ व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांच्या सह तेथील कर्मचारी यांनी निवेदन दिले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सचिव मुलाणी म्हणाले की, राज्यातील वित्त विभागाचा गाडा हकणारे कर्मचारी यांनाच जर वेळेवर वेतन मिळत नसेल तर यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती असू शकते. जरी आम्ही कंत्राटी असलो तरी आम्हाला वेतन मिळायला नको का ? ठेकेदार तुपाशी आणि कर्मचारी उपाशी अशी दशा संपूर्ण राज्यात झाली आहे. एकीकडे राज्यशासन 7 वेतन आयोग देण्याची गोष्ट करते. तर कंत्राटी कर्मचारी यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई जीएसटी भवन मधील कंत्राटी कर्मचारी यांचे वेतन कंत्राटदाराने मधील 3- 4 महिन्यांपासून न दिल्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपले गहराने महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर यांच्याकडे मांडले असतात संघटनेचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांना संपर्क करण्यास सांगितले, त्याची तात्काळ दखल घेत तेथील कर्मचारी करिश्मा श्रीधनकर, प्रिती चव्हाण, प्रशांत झावरे, सुकण्या किर या शिष्टमंडळासहीत मुलाणी यांनी अर्थ व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली असता मुनगंटीवार यांनी जीएसटी आयुक्त यांच्याशी संपर्क करीत कंत्राटी कर्मचारी यांचे थकीत वेतन देण्याबाबत सूचना दिल्या.

   Print


News - Rajy | Posted : 2018-12-28


Related Photos